हायलाइट्स:
- राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात धक्कादायक घटना
- ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार
- गावाच्या बाहेर जखमी अवस्थेत सापडली मुलगी
- शेजाऱ्याच्या नातेवाइकाने केले लज्जास्पद कृत्य
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तारानगर पोलीस ठाण्यात एका संशयित व्यक्तीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारानगर पोलिसांनी येथील स्थानिक रुग्णालयात बालिकेची वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रविवारी रात्री साधारण आठ वाजताच्या सुमारास तिची आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी तिचा रात्रभर गावात शोध घेतला. पहाटे साधारण चार वाजता गावाच्या बाहेर एका मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. कुटुंबीयांनी जाऊन पाहिलं असता, ११ वर्षांची मुलगी जखमी अवस्थेत पडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी बालिकेला घरी नेले. तिच्याकडे घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. त्यावेळी मुलीने तिच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. संध्याकाळी ती घरासमोर उभी होती. त्याचवेळी एक तरूण दुचाकीवरून तिथे आला. त्याने तिला दुचाकीवर बसवले आणि तिला गावाच्या बाहेर घेऊन गेला. तिथे आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. बालिकेचा शोध घेणाऱ्यांचा आवाज ऐकून त्या तरूणाने त्याची बाइक तिथेच सोडून पळ काढला. आरोपी तरूण हा पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा नातेवाइक आहे. त्याचे गावात येणे-जाणे होते. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times