हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेशातील नोएडात सूरजपूर परिसरात धक्कादायक घटना
  • नोकरीवरून काढून टाकलेल्या नोकराचे धक्कादायक कृत्य
  • हौदातील पाण्यात विष मिसळले, ५८ गायी दगावल्या
  • पोलिसांनी आरोपीला केली अटक, आरोपीला दारूचे व्यसन

नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सूरजपूर क्षेत्रातील खोदना खुर्द गावातील एका व्यक्तीने क्रूरतेची परिसीमा गाठली. नोकरीवरून काढून टाकले म्हणून ५८ गायींना पाण्यातून विष पाजून मारले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सूरजपूर परिसरातील खोदना खुर्द गावात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपी हा पीडित व्यक्तीकडे नोकरी करत होता. आरोपीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे मालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने गायींना विष देऊन मारले.

बेपत्ता ११ वर्षीय मुलगी गावाबाहेर सापडली; आपबीती सांगितल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का
डेटिंग साइटवर ओळख, चौथ्या दिवशी भेटीनंतर शरीरसंबंध; तरुणाने चारित्र्यावर घेतला संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोदना खुर्द येथे राहणाऱ्या ओमवीर नागर यांची डेअरी आहे. त्यांच्याकडे अनेक गायी आहेत. ओमवीर नागर याच्या ५८ गायींचा या पाच दिवसांमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या प्रकरणी संशय आल्याने नागर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी तपासणी केली असता गायींचा मृत्यू विषामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संशयावरून पोलिसांनी नागर यांच्याकडील जुन्या नोकराला अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपी हा दारूड्या असल्याचे समजले. त्यामुळे त्याला नागर यांनी नोकरीवरून काढून टाकले होते.

मुंबईत उच्चभ्रू सोसायटीत ४ महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार, अखेर त्या महिलेने…
धक्कादायक! ७५ वर्षीय वृद्धाचा तरुणीवर अत्याचार; मुलगा व पुतण्यालाही अटक

नोकरीवरून काढून टाकल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याने या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरवले. त्याने गायींना ज्या हौदातून पाणी पाजले जाते, त्या हौदामध्ये विष मिसळले होते. हौदातील पाणी प्यायल्याने गायींचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here