हायलाइट्स:
- भाजप नेत्यावर गुंडांनी केला हल्ला, झारखंडमधील घटना
- हल्ल्यात राम सिंह मुंडा यांच्या हाताला गंभीर दुखापत
- जमशेदपूर येथील परसुडीह येथे अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला
- प्राथमिक उपचारानंतर राम सिंह यांच्यावर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू
या हल्ल्याच्या घटनेनंतर जखमी झालेल्या मुंडा यांना तात्काळ खशमहल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, राम सिंह हे सकाळी आठ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. ते भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांच्या घरी घोडाबांधा येथे जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला.
परसुडीह पोलीस ठाण्याचे अधिकारी विमल किंडो यांनी सांगितले की, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सुपुडेरा येथे राजकीय मध्य विद्यालयाजवळ राम सिंह यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राम सिंह यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. आम्ही या घटनेचा तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही.
या हल्ल्याच्या घटनेने मोठा धक्का बसला आहे. मुंडाजी हे दरवर्षी आपल्या घरी पूजेचे आयोजन करतात आणि त्यासाठी ते आदल्या रात्री घरी येतात. मी पक्षाच्या दोन सहकाऱ्यांना मुंडाजी यांच्या घरी पोहोचण्यास सांगितले होते. ज्यावेळी मी त्यांच्या घराकडे निघालो होतो, त्यावेळी सरकारी शाळेच्या जवळ एका वळणावर दोघा जणांनी मला थांबण्यास सांगितले. त्यांना काही गरज असेल असे वाटले म्हणून मी थांबलो. त्यांनी अचानक माझ्यावर हल्ला चढवला. माझ्यावर लोखंडी रॉडने प्रहार केले, असे राम सिंह यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times