निमित्त होते जनौषधी दिनाचे. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान यांनी देशातील काही जनौषधी केंद्राशी व्हिडिओ कॉन्फरन्सशी संवाद साधला. या दिनानिमित्ताने ससून रुग्णालयात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोदी यांनी देशातील सात केंद्राशी संवाद साधला. त्यापैकी ससून रुग्णालयात एक केंद्र आहे. ससूनच्या कार्यक्रमात महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, बी.जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक गणेश बिडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. इब्राहिम अन्सारी, डॉ. हरीश टाटिया, जनऔषधी केंद्र संचालक मनीष ओसवाल उपस्थित होते.
मोदींनी पुण्यातील या महिलेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कौन है पुणे मे? कौन बात करेंगे…? असा सवाल केला. त्यावर झेबा खान यांनी मोदींना नमस्ते मोदीजी म्हणत जनौषधी केंद्रामुळे मिळालेल्या लाभाचं वर्णन केलं. तसंच खर्चिक औषधांमुळे माझ्या घरचं बजेट कोलमडलं होतं. मात्र, तुमच्या या योजनेमुळे मला लाभ झाला. माझ्या मुलांचं त्यातून शिक्षण होत आहे, असं झेबा यांनी सांगितलं. झेबा यांनी आपण किडनी रुग्ण असल्याचं सांगितलं. तेव्हा एवढ्या कमी वयात तुम्ही किडनी पेशंट कशा? असा सवाल करत तुम्ही या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावं, अशी मी अल्लाकडे प्रार्थना करतो, असं मोदी म्हणाले.
मुलगीचं नाव काय?
मोदींनी झेबा यांच्याशीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधत आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर मोदींनी कुटुंबात कोण आलं? असा सवाल केला. त्यावर मुलींना सोबत आणल्याचं झेबा यांनी सांगितलं. तेव्हा काय मुलगीचं नाव काय? मुलीचं नाव काय? असं मोदींनी मराठीत विचारताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर झेबा यांच्या मुलीला शिक्षण घेत आहे का? कोणतं शिक्षण घेत आहे? असा सवाल केला. त्यावर या मुलीनं तिचं नाव अल्फिया असं सांगत टेक्स्टाइलच शिक्षण घेत असल्याचं सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times