हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील धक्कादायक घटना
  • १५ वर्षीय मुलीचा झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला
  • महिनाभरापूर्वीच गावातील तरुणाने केले होते अत्याचार
  • पोलिसांनी आरोपीसह त्याच्या आई आणि भावाविरोधात दाखल केला गुन्हा

मेरठ: उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील आदमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरापूर्वी एका नराधमाच्या अत्याचारांना बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेचे संतापलेल्या नातेवाइकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेनंतर संतापलेल्या नातेवाइकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका महिन्याहून अधिक काळ लोटला तरी, आरोपीविरोधात पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला. आरोपीकडून वारंवार पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात होत्या. पीडितेचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. अमरोहा पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित झालेल्या प्रश्नचिन्हानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे हे प्रकरण आहे. आदमपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि इतर दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपी, त्याची आई आणि भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत उच्चभ्रू सोसायटीत ४ महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार, अखेर त्या महिलेने…
डेटिंग साइटवर ओळख, चौथ्या दिवशी भेटीनंतर शरीरसंबंध; तरुणाने चारित्र्यावर घेतला संशय

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आदमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. येथील शेतकऱ्याची १५ वर्षांची मुलगी रविवारी सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी आपल्या शेतावर गेली होती. दुपार झाली तरी, ती परत आली नाही. तिचा शोध घेण्यात आला. त्याचवेळी तिच्या कुटुंबीयांना मुलीचा मृतदेह शेताजवळील एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. तिचे हात पाय दोरीने बांधलेले होते. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आरोप केला की, गावातीलच एका तरुणाने त्यांच्या मुलीवर अत्याचार केले. मात्र, पोलिसानी आरोपीला अद्याप अटक केली नाही.

धक्कादायक! नोकरीवरून काढून टाकले, नोकरानं ५८ गायींना पाण्यातून पाजलं विष
Jharkhand : भाजप नेत्यावर दुचाकीवरून आलेल्या गुंडांकडून हल्ला, रुग्णालयात दाखल

या घटनेनंतरही आरोपी तरूणाकडून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावले जात होते. पोलीस आणि आरोपीचे जवळचे नातेसंबंध आहेत, असा आरोपही होत आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी, त्याची आई आणि भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. श्वास कोंडल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here