नवी दिल्लीः गुरुग्राममध्ये कोट्यवधींच्या मालकाचा नोकर लुटारू निघाला. त्याने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने दोन कोटींचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. नोकराने मालकीन आणि तिच्या नातवाला बांधून माल लुटला. यात सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने होते. गुरुग्राममधील ज्वेलर्स प्रदीप गुप्ता यांची घरी भरदिवसा ही घटना घडली.

गुरुग्राममधील सेक्टर ४५ मध्ये नोकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने आधी वृद्ध मालकीनीला बांधले. यानंतर तिच्या नातवाला बांधले. मग त्यांनी एक एक करून घरातील रोकड, सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने लुटले आणि फरार झाले. एक तासात्या प्रयत्ना नंतर महिलेने स्वतःची सुटका केली. त्यांनी पती आणि पोलिसांना फोन केला. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासायला गेले. पण सीसीटीव्हीचा डीव्हीआर त्यांनी पळवला होता. यानंतर पोलिसांनी गल्लीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात चोर हातात बॅग घेऊन पळताना दिसून आले.

मालकीनीने नोकर घरात काम देण्यापूर्वी त्याचे ओळखपत्र तपासले नाही. त्याचं पोलिसांकडून पडताळणी केली नाही. याचा फायदा नोकराने घेतला. घर मालक प्रदीप गुप्ता हे दिल्लीत सोने-चांदीच्या दागिन्यांवर हँडक्राफ्टचे काम करतात. यामुळे घरात सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने होते. हे दागिने एका कंपनी खरेदीस नकार दिल्याने घरात होते. याची माहिती नोकराला होती. त्याने घराची रेकी केली. मालकीनीला बांधून त्याने सुमारे दोन कोटींचे दागिने लुटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here