हायलाइट्स:
- लातूरमध्येही गांजाची शेती केली जात असल्याचं आलं समोर
- पोलिसांनी ऊसाच्या शेतात धाड टाकली
- गांजा लागवड करणारा शेतकरी पोलिसांच्या ताब्यात
गांजाची लागवड करून आर्थिक समृद्धीचं सप्न पाहणाऱ्या औसा तालुक्यातील येळी या शिवारात नारायण संतराम साठे या शेतकऱ्याने थेट ऊसातच गांजाची लागवड केली होती. याबाबत औसा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शेतात धाड टाकली. यावेळी गांजाची १५ झाडे आढळून आली.
सदर गांजाच्या झाडांचं घटनास्थळीच दोन शासकीय पंचांसमक्ष पंचनामा करून वजन केले असता त्याचे वजन १८ किलो आणि किंमत अंदाजे १ लाख २६ हजार रुपये इतकी असल्याचं कळालं. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत नारायण साठे या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं.
दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वात औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक घोरपडे, स.फौ. रामराव चव्हाण, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, सुर्यवंशी, दंतुरे, महेश मर्डे, समीर शेख, भारत भुरे, डांगे, भागवत, गोमारे यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times