हायलाइट्स:

  • कोलकाता येथील रवींद्र सरोबार पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना
  • रागाच्या भरात पतीने पत्नी आणि एकुलत्या एक मुलीवर केले वार
  • गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू, मुलगी जखमी
  • घटनेनंतर आरोपीने पोलिसांनी कॉल करून दिली माहिती

कोलकाता: रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीची हत्या आणि एकुलत्या एक मुलीवर वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर भानावर आलेल्या आरोपीने स्वतःच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक आमदार घटनास्थळी पोहोचले. याबाबत विचारणा केली असता, रागाच्या भरात माझ्याकडून हे कृत्य घडले आहे, असे आरोपीने सांगितले.

शनिवारी संध्याकाळी पत्नी प्रियांका आणि १८ वर्षीय मुलीवर आरोपीने धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर आरोपीने १०० क्रमांकावर फोन करून कोलकात्यातील लाल बाजार पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नियंत्रण कक्षात असलेले पोलीस कर्मचारीही हैराण झाले. त्यानंतर नियंत्रण कक्षातून या घटनेची माहिती रवींद्र सरोबार पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पुण्यातील पिंपरीत खळबळ; अनैतिक संबंधांतून तरुणाची हत्या, मृतदेह हातभट्टीत टाकला

प्राध्यापिकेच्या हत्येचा ‘असा’ झाला उलगडा; आदल्या दिवशीच पतीविरोधात केली होती तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय अरविंद हा आपली पत्नी आणि मुलीसह रवींद्र सरोबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होता. अरविंद हा आपल्या सासऱ्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय करत होता. विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता.

मध्यरात्री ‘त्या’ घरात असं काही घडलं की अख्खं गाव हादरलं

सूत्रांच्या माहितीनुसार, अरविंदने शनिवारी संध्याकाळी आपल्या पत्नी आणि मुलीवर वार केले. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रवींद्र सरोबार पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here