वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

गो फर्स्ट (गो एअर) कंपनीच्या श्रीनगर-शारजा विमानाला पाकिस्तानच्या हद्दीतून जाण्याची परवानगी देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या महिन्यांत श्रीनगर-शारजा विमानाचे उद्घाटन केले होते. गो फर्स्ट कंपनीने २३ ऑक्टोबरपासून या मार्गावर विमानसेवा सुरू केली होती. ३१ ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानच्या हद्दीतूनच विमाने ये-जा करीत होती. मात्र, मंगळवारी पाकिस्तानने आपल्या हद्दीतून विमान नेण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीनगरहून शारजाला जाणाऱ्या विमानाला गुजरातहून जाण्यास भाग पडले आहे. हा मार्ग लांबचा असल्याने विमानाला ४० मिनिटे विलंब होत आहे.

JK: कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतोय, पंतप्रधान मोदींची जवानांना भावनिक साद
UP Elections: सरकारी कामांचा पाढा वाचताना योगींनी केली कब्रस्तान – मंदिरांची तुलना

पाकिस्तानने परवानगी नाकारल्याचे कोणतेही कारण दिलेले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. गो फर्स्ट कंपनीनेही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. जम्मू-काश्मीरमधून ११ वर्षांनी ही पहिलीच सेवा सुरू झाली होती. एअर इंडिया एक्स्प्रेसने श्रीनगर-दुबई विमान २००९ मध्ये सुरू केले होते. मात्र, त्याला प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने काही काळाने विमान रद्द करण्यात आले.

पाकिस्तानने परवानगी नाकारल्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया देताना हा दुर्दैवी प्रकार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने एअर इंडिया एक्स्प्रेसच्या बाबतीतही हाच प्रकार २००९-१०मध्ये केला होता. पाकिस्तानने परवानगी नाकारल्याने दोन्ही देशातील संबंधातील स्थिती स्पष्ट होत आहे, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारवर टीका केली आहे. श्रीनगरहून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करताना केंद्र सरकारने पाकिस्तानच्या हद्दीतून जाण्याची परवानगी घेतली नाही हे गोंधळात टाकणारे आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता केवळ प्रसिद्धीचा स्टंट केला जात आहे, असा आरोप मेहबूबा यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ ऑक्टोबर रोजी जी-२० परिषदेसाठी रोमला गेले होते. तेथून ते दोन नोव्हेंबर रोजी परतले. त्यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीतून जाऊ देण्यास पाकिस्तानने परवानगी दिली होती.

Diwali Celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत देशातील नेत्यांकडून जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा!
petrol and diesel excise duty : भाजपशासित राज्यांचा मोठा निर्णय; केंद्रानंतर ६ राज्यांची इंधनावरील व्हॅटमध्ये कपात

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here