हायलाइट्स:

  • चंदीगडमधील धक्कादायक घटना, विद्यार्थ्याचे शिक्षिकेकडून शोषण
  • आरोपी महिलेला चंदीगड पोलिसांनी केली होती अटक
  • जिल्हा कोर्टाने आरोपी महिलेला सुनावली दहा वर्षे कैद
  • पीडित मुलाच्या आईवडिलांनी पोलिसांत केली होती तक्रार

चंदीगड: शिकवणीसाठी येणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शिक्षिका दोषी असल्याचे सिद्ध झाले असून, चंदीगडच्या जिल्हा कोर्टाने संबंधित शिक्षिकेला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने दोषी शिक्षिकेला १० हजार रुपये दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगा शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होता. या कालावधीत या शिक्षिकेने मुलाचे लैंगिक शोषण केले. मुलाच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली होती.

आरोपी शिक्षिकेला चंदीगड पोलिसांनी २४ मे २०१८ रोजी अटक केली होती. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलाचे समुपदेशन केल्यानंतर त्याने महिला शिक्षिकेचे कृत्य उघडकीस आणले होते. यानंतर त्याच्या पालकांनी आरोपी महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि पीडित मुलाचे कुटुंबीय एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

सहा वर्षांच्या मुलीसमोरच घडला भयानक प्रकार; आईची हत्या ड्रायव्हरने केल्याचे उघड

पीडित मुलगा आणि त्याची बहीण सप्टेंबर २०१७ पासून या शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होते. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, या महिलेने मुलाच्या पालकांना त्यांचा मुलीला अन्य वेळेला शिकवणीसाठी पाठवण्यास सांगितले होते. त्यांच्या मुलाला चांगल्या रितीने शिकवता येईल, असे या आरोपी महिलेने पालकांना सांगितले होते. शिक्षिकेच्या सांगण्यावरून पालकांनी मुलगा आणि मुलीला वेगवेगळ्या वेळेला शिकवणीसाठी पाठवायला सुरुवात केली. त्यानंतर या महिलेने मुलाचे लैंगिक शोषण केले.

रागाच्या भरात ‘त्याच्या’ हातून नको ते घडलं; घटनेनंतर भानावर आला अन्….

मार्च २०१८ मध्ये पीडित मुलाच्या पालकांनी त्याला शिकवणीसाठी पाठवणे बंद केले. त्यामुळे चिडलेल्या शिक्षिकेने मुलाला आपला पती आणि मुलाच्या पालकांच्या समोरच एका खोलीत डांबले. शेजाऱ्यांच्या मदतीने या मुलाची महिलेच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान, या प्रकरणात महिलेला अटक केल्यानंतर कोर्टात खटला चालवण्यात आला. महिला आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने तिला १० वर्षे कैद आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

प्राध्यापिकेच्या हत्येचा ‘असा’ झाला उलगडा; आदल्या दिवशीच पतीविरोधात केली होती तक्रार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here