हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री योगी अयोध्येत
  • भव्य दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी
  • ‘भाजप सरकार मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी पैसा खर्च करतंय’

अयोध्या, उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील मागच्या सरकारवर टीका करताना आणि आपल्या सरकारच्या कामांचा पाढा वाचताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नकळत कब्रस्तान आणि मंदिरांची तुलना केलीय.

भाजप सरकार जनतेचा पैसा कब्रस्तानांसाठी जमीन खरेदीसाठी तर मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी आणि सौंदर्यकरणासाठी खर्च करत आहे, असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलंय. राम कथा पार्कात उत्तर प्रदेश सरकारकडून आयोजित भव्य दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी सहभागी झाले होते.

‘अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचं काम सुरू आहे. २०२३ साली या मंदिराचं काम पूर्ण होईल. सोबतच केंद्र सरकार उत्तर प्रदेशात ५०० मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांचंही सौंदर्यकरण करत आहे. यातील ३०० हून अधिक ठिकाणी काम पूर्ण झालंय. उरलेलं काम पुढच्या दोन महिन्यांत पूर्ण होईल’, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय.

JK: कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतोय, पंतप्रधान मोदींची जवानांना भावनिक साद
petrol and diesel excise duty : भाजपशासित राज्यांचा मोठा निर्णय; केंद्रानंतर ६ राज्यांची इंधनावरील व्हॅटमध्ये कपात
‘मोफत रेशनिंग योजना होळीपर्यंत सुरू राहील’

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना पुढच्या वर्षीच्या होळीपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना मोफत रेशन उपलब्ध होईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. ही योजना नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात येणार होती. परंतु, सरकारनं ही योजना पुढच्या मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेंतर्गत नागरिकांना गहू, तांदूळ, मीठ, साखर, डाळ आणि तेल मोफत उपलब्ध करून दिलं जातं. या योजनेचा फायदा उत्तर प्रदेशातील १५ कोटी लोक घेत असल्याचं सांगण्यात येतंय.

सेमी योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी अयोध्येत


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण

उल्लेखनीय म्हणजे, कब्रस्तान आणि मंदिरांच्या माध्यमातून हिंदू – मुस्लीम असा फरक दर्शवणारं वक्तव्य करणारे योगी आदित्यनाथ हे काही भाजपचे पहिलेच नेते नाहीत. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जवळपास पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील तत्कालीन सत्ताधारी समाजावादी पक्षावर टीका करताना कब्रस्थान आणि स्मशानभूमीची तुलना करणारं वक्तव्य केलं होतं. ‘एखाद्या गावात कब्रस्थान बांधलं जात असेल तर तिथं स्मशानभूमीही उभी राहायला हवी. रमझानच्या वेळेस भारनियमन केलं जात नसेल तर दिवाळीच्या वेळेसही केलं जाऊ नये. जर होळीच्या दिवशी वीज कायम असेल तर ईदच्या दिवशीही वीज पुरवठा खंडीत होता कामा नये’ असं वक्तव्य मोदींनी २०१७ च्या फतेहपूरमधल्या भाषणात केलं होतं.

Diwali Celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत देशातील नेत्यांकडून जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा!
rahul gandhi srk : आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुख खानला राहुल गांधींचे पत्र; लिहिले…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here