हायलाइट्स:

  • पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची हत्या
  • दुचाकीवरून जात असताना मित्राची केली हत्या
  • हरदोई जिल्ह्यातील धक्कादायक घटनेने खळबळ
  • पोलिसांनी ब्लाइंड मर्डर मिस्ट्रीचा ‘असा’ केला खुलासा

हरदोई: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील पोलिसांनी एक ब्लाइंड मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यात यश मिळवलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने त्याच्या मित्राची हत्या केली होती. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला.

पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, अज्ञात मारेकऱ्याविरोधात लूटमार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेत पोलिसांच्या हाती एकही पुरावा नव्हता. ही ‘ब्लाइंड मर्डर मिस्ट्री’ उलगडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके कार्यरत होती. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केल्यानंतर, तंत्रज्ञानाच्या मदतीने या हत्येच्या प्रकरणात मृताच्या मित्राला अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी मृताची सोन्याची चेन, रोकड आणि हत्येत वापरलेले शस्त्रही हस्तगत केले आहे.

शिकवणीला येणाऱ्या १४ वर्षीय मुलाचं शिक्षिकेकडून शोषण; कोर्टानं ठोठावली शिक्षा
सहा वर्षांच्या मुलीसमोरच घडला भयानक प्रकार; आईची हत्या ड्रायव्हरने केल्याचे उघड

ईश्वरपूर साई गावात ३२ वर्षीय सरोज याचा मृतदेह २० ऑक्टोबर रोजी रात्री गावाजवळ सापडला होता. रात्रीच्या वेळी आपले दुकान बंद करून तो दुचाकीवरून घरी निघाला होता. मात्र, घरी पोहोचला नाही. गावापासून काही अंतरावरच त्याचा मृतदेह आढळला होता. मृताच्या डोक्यावर हातोड्याने वार केल्याच्या खुणा होत्या. त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि रोकडही गायब होती. त्यानंतर मृताच्या भावाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

रागाच्या भरात ‘त्याच्या’ हातून नको ते घडलं; घटनेनंतर भानावर आला अन्….
क्राइम शो बघून शेजारच्या मुलांनी केली ‘त्या’ वृद्धेची हत्या; पुण्यातील घटनेने खळबळ

सरोज याची हत्या त्याचा मित्र पवन याने केल्याची गुप्त माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पवनला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सरोजचे त्याच्या घरी रोज येणे-जाणे असायचे. आपल्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यावरून त्याने सरोजची हत्या केली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याची चेन आणि रोकड हस्तगत केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here