काबूल: काळीज पिळवटून टाकणारी घटना तालिबानची राजवट असलेल्या अफगाणिस्तानात घडली आहे. हाताला कामधंदा नसल्याने अन्नावाचून अनेकांचे हाल होत आहेत. अनेकांना उपाशीपोटी दिवस ढकलावे लागत आहेत. अशाच एका कुटुंबाचे अन्नावाचून हाल सुरू होते. जगण्यासाठी किमान अन्न मिळावे, यासाठी कुणावरही कधी न येवो अशी वेळ एका बापावर आली. आपल्या पोटच्या ९ वर्षांच्या मुलीला त्याने एका वृद्धाला विकले. त्याबदल्यात मिळालेल्या पैशांतून किमान कुटुंबातील इतर सदस्यांना उपाशीपोटी राहावे लागणार नाही, असे या बापाला वाटले.

अफगाणिस्तानच्या काही भागांत भीषण परिस्थिती आहे. अर्थव्यवस्थेची चक्रे रुतल्याने अनेकांना बेरोजगार राहावे लागत आहे. काही भागांत तर इतकी भीषण परिस्थिती आहे, की लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अनेक लोकं या भागातून त्या भागात स्थलांतरित होत आहेत. याच उपासमारीमुळे एका बापावर काळजावर दगड ठेवून आपल्या मुलीला विकण्याची वेळ आली आहे. कुटुंबातील इतर सदस्यांना जगवायचे कसे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. अखेर त्याने आपल्या ९ वर्षांच्या मुलीला एका ५५ वर्षीय व्यक्तीला विकावे लागले. त्याबदल्यात मिळालेल्या पैशांतून किमान आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या पोटाची खळगी भरता येतील, अशी आशा त्या पित्याला होती.

मन सुन्न करणारी घटना! फटाके देण्याच्या बहाण्याने नेले, मुलाला पुलावरून नदीत फेकले

आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पित्यावर आपल्या मुलीला विकण्याची वेळ आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. या पित्याने या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, महिनाभरापूर्वीच आपल्या एका १२ वर्षांच्या मुलीला विकले होते. आता कुटुंबातील इतर सदस्यांना जगवण्यासाठी ९ वर्षांच्या मुलीला विकावे लागले. ही सगळी कहाणी सांगताना या पित्याच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याच्या मनाला ही सल कायम टोचत राहील असे तो पिता सांगत होता. ही आपल्यासाठी शरमेची बाब आहे आणि मला आता मुलीची काळजी वाटतेय असं तो पिता सांगत होता.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रचला होता भयानक कट

दुसरीकडे, या मुलीला शिकून शिक्षिका व्हायचे होते. पण आर्थिक चणचणीमुळं शिक्षणाची दारं माझ्यासाठी कधीच बंद झाली. आता तिचे लग्न एका ५५ वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत होणार आहे. तो मारहाण करील अशी भीती तिला सतावत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here