हायलाइट्स:

  • ब्रेन डेड झालेल्या ४६ वर्षीय बारामतीकराचं अवयव दान
  • शहरातील हे ३७ वे अवयव प्रत्यारोपण
  • ऐन दिवाळीत २ जणांच्या आयुष्यात प्रकाश

पुणे : पाय घसरून पडल्याने ब्रेन डेड झालेल्या ४६ वर्षाच्या एका बारामतीकराने अवयवदान (अवयवदान) करत पुण्यासह मुंबईतील रुग्णाला जीवदान दिले. पुण्यातील एका ज्येष्ठाला यकृत आणि मूत्रपिंड तर मुंबईच्या रुग्णाला हृदय देऊन ऐन दिवाळीत त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे.

करोनाच्या काळातही पुण्यात अवयव प्रत्यारोपण सुरू आहे. आतापर्यंत शहरातील हे ३७ वे अवयव प्रत्यारोपण ठरलं आहे. यामुळे अनेकांना जीवदान मिळालं आहे.

Sharad Pawar: बारामतीतून खास बातमी; शरद पवार यंदा पाडव्याला शुभेच्छा स्वीकारणार, पण…

बारामती येथील रहिवासी असलेली एक ४६ वर्षाची व्यक्ती पाण्याची टाकी भरली का हे पाहून येत असताना घराच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्यात डोक्याला इजा झाल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथून त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आलं. उपचार सुरू असताना औषधांना प्रतिसाद देणं बंद केल्यानं त्यांना ब्रेन डेड म्हणून जाहीर करण्यात आले,’ अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जोशी यांनी दिली.

‘दिवाळीनंतर बॉम्ब’, या वक्तव्यावरून रोहित पवारांचा फडणवीस यांना जोरदार टोला

ब्रेन डेड व्यक्तीच्या पत्नीने संमती दिल्यानंतर २ नोव्हेंबरला अवयव प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर अवयव दान करण्यात आले. रुबी हॉल क्लिनिकमधील एका ज्येष्ठाला यकृत आणि मूत्रपिंड देण्यात आले, तर मुंबईतील एच.आर.रिलायन्स रुग्णालयातील रुग्णाला हृदय देण्यात आले.

दरम्यान, पुण्यातील ज्येष्ठाला दोन महिन्यांपासून मूत्रपिंड आणि यकृताचा त्रास सुरू होता. त्यासाठी अवयव प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार प्रत्यारोपण करण्यात आलं, असं सुरेखा जोशी यांनी सांगितलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here