हायलाइट्स:
- ३० वर्षीय महिलेवर कपाशीच्या शेतात नेऊन अत्याचार
- वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- आरोपीला पोलिसांकडून एक तासाच्या आत अटक
वाळूज पोलीस ठाण्यात, पीडित महिलेच्या सासूने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिची ३० वर्षीय सून ही काहीशी भोळसर स्वभावाची आहे. ती बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेतात गाईला चारा टाकण्यासाठी गेली होती. दरम्यान संशयित आरोपी देविदास फुके हा तिच्या मागावर होता. देविदास याने तिला कपाशीच्या शेताजवळ गाठले आणि तिला कपाशी शेतात चल म्हणत ओढू लागला. पीडिता अचानक घाबरुन गेली, तिने नकार देताच देविदास याने तिला बळजबरीने शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेची माहिती कोणाला दिली तर ठार मारुन टाकीन अशी धमकीही अत्याचार करणाऱ्याने दिली. याप्रकरणी पीडितेच्या सासूने वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यावरुन संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडिता ही भोळसर स्वभावाची असून मेडीकल आणि कागदोपत्री माहितीनंतर खरा प्रकार समोर येईल अशी माहिती सहायक निरीक्षक शेळके यांनी दिली.
संशयिताविरोधात उपनिरीक्षक चव्हाण यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा शोध घेऊन संशयित फुके याला तात्काळ बेड्या ठोकल्या. गुरुवारी (४ नोव्हेंबर) फुकेला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक निरीक्षक विनायक शेळके करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times