– पुरुषोत्तम शुक्ल

मेष – कलाक्षेत्राला प्रोत्साहन
या सप्ताहात शुक्राची मेहेरनजर असल्याने कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगला काळ राहील. प्रवासाचे योग येतील. अंगीकृत कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. येणारे प्रश्न संयमाने सोडविणे हितकारक ठरणार आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहा. कोणत्याही गोष्टींचा मनावर परिणाम होऊ न देता, पुढील मार्गक्रमणा करावी. घडलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यांचा विचार करण्याचे टाळावे. नोकरदारांना दिलासा मिळेल. शिक्षण व राजकीय क्षेत्रांत प्रगती कराल. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रकृतीमान ठीक राहील.

वृषभ – प्रकृतीस्वास्थ्य जपा

आपले ग्रहमान पाहता प्रकृतीस्वास्थ्याच्या दृष्टीने आपण जागरूक राहणे हितकारक ठरू शकते. धार्मिक स्थळांना भेटीचे योग संभ‌वतात. प्रलोभनांपासून दूर राहा. अचानक प्रवास योग संभवतात. प्रकृतीबाबत विशेष काळजी घ्यावी, विशेषत: खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. उष्णतेचे विकार संभवतात, तेव्हा जपा. वेळीच औषधोपचार करावेत, चालढकलपणा करू नये. प्रॉपर्टीसंबंधी वादाचे प्रसंग उद्भ‌वू शकतात, तेव्हा ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरू शकतो. आपल्या मुलांना प्रोत्साहित करा. नातलगांच्या थट्टामस्करीला आवर घाला. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.

मिथुन – चांगला आठवडा

या सप्ताहात पुष्कळशा गोष्टी साध्य करता येणे शक्य असल्याने आठवडा चांगला जाईल. काही भाग्यवंतांना परदेश दौऱ्याची शक्यता आहे. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. क्रीडा व राजकारण क्षेत्रातील व्यक्तींना प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. काहींना नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. व्यापार उद्योगात वाढ होण्याची शक्यता राहील. सरकारी कामांना प्राधान्य द्या. मालमत्तेच्या संरक्षणाची तरतूद करावी. कामकाजात अडथळे आले तरी घाबरून न जाता, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराची साथ मिळेल.

कर्क – सकारात्मक दृष्टीने वागा

या आठ‌वड्यात सकारात्मक दृष्टीने पुष्कळशा गोष्टी साध्य होतील. अर्थप्राप्तीच्या नव्या योजना आखण्यास प्रारंभ करा. हितशत्रूंच्या ससेमिऱ्याची चिंता करण्याचे कारण नाही. कोर्टदरबारच्या कामांना चालना मिळेल. जागेसंबंधीचे प्रश्न सोडविता येणे शक्य होतील. शेतीविषयक कामांना गती मिळेल. प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नका. वेळीच खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. कलाक्षेत्राला वाव मिळेल. कामकाजात काटेकोरपणा ठेवावा. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी अधिक श्रम घ्यावेत.

सिंह – मिळणाऱ्या संधीचा लाभ घ्या

दैनंदिन कामकाजात व येणाऱ्या योग्य संधीचा उपयोग करून घेतल्यास आपण आपले कार्य साध्य करू शकाल. प्रवासाचे योग येतील. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल व आपल्या नावलौकिकात भर पडेल. आपले मत प्रदर्शित करण्याचे कटाक्षाने टाळा. आत्मविश्वासाने कामाची उकल करा. विद्यार्थ्यांना शिक्षण, क्रीडा, तांत्रिक क्षेत्रांत प्रगती साधता येईल. नोकरी-व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. सरकारी नियमांची पायमल्ली होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रकृतीस्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम व सकस आहाराची आवश्यकता राहील. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

कन्या – सर्व दृष्टीने विचाराने वागा

कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी इतरांची गरज कशी आहे याचा विचार करून वागणे सर्व दृष्टीने हितकारक राहील. जागेसंबंधीच्या प्रश्नांना उत्तम प्रतिसाद मिळू शकेल. शेतीविषयक कामांना गती मिळेल. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आर्थिक व्यवहारात तज्ञांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल टाकावे. आपले म्हणणे इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याबद्दल गैरसमज पसरणार नाहीत याची दक्षता घ्या. घरगुती वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रलोभनांपासून दूर राहा. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.

तुळ – यशाची वाटचाल कराल

ग्रहमान पाहता आपण जिद्द व आत्मविश्वास यांच्या जोरावर यशाची वाट सहज चालू शकाल. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. काही भाग्यवंतांना सामाजिक कार्यात प्रसिद्धीचे वलय प्राप्त होऊ शकते. नोकरी व्यवसायात प्रगतीची वाटचाल करू शकाल. घरगुती प्रश्नांना प्राधान्य द्या. कायदा व नियमांचे पालन करा. आपल्या क्षमतेप्रमाणे इतरांना आश्वासन द्यावेत. घरातील सजावटीची कामे सध्या लांबणीवर टाकावीत. कर्म हेच माणसाचे सुखदु:खाचे कारण असते, तेव्हा कर्म सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. जोडीदाराची साथ मिळेल.

वृश्चिक – नम्रतेचे धोरण स्वीकारा

या सप्ताहात आपण नम्रतेचे धोरण स्वीकारल्यास बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. आपल्या बोलण्यावर योग्य निर्बंध ठेवावा म्हणजे नाराजी व गैरसमज टाळू शकाल. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळू शकेल. आपणास आवड असलेल्या गोष्टी प्रेमाने करीत राहिल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करू शकाल. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्यावर येण्याची शक्यता आहे. नको त्या प्रलोभनात अडकू नका. प्रकृतीची पथ्ये विशेषत: खाणे-पिणे सांभाळा. जोडीदाराची साथ मिळेल.

धनु – नियम व कायदा पाळा

साडेसाती पर्वातून आपण प्रवास करीत आहात, तेव्हा सरकारी नियम व कायद्याचे पालन कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करा. कामाचा उत्साह असला तरी कोणालाही जिव्हारी लागेल असे बोलणे टाळा. आपल्या निर्णयात ठामपणा ठेवणे हितकारक ठरणार आहे. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. चिंता करण्यापेक्षा चिंतन करणे आवश्यक राहील. प्रकृतीची पथ्ये पाळा. वैवाहिक जोडीदाराशी जुळ‌वून घेणे शक्य होईल.

मकर – खर्च वाढेल

या सप्ताहात खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने प्रथमपासून अनावश्यक खर्च टाळा. धार्मिक स्थळी प्रवासाचे योग संभ‌वतात. आपल्या वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रवासात सावधानता बाळगा. सरकारी नियमांचे उल्लंघन करण्याचे कटाक्षाने टाळा. सरकारी कामांना प्राधान्य द्या. छोट्या प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. शांतपणे विचार केल्यास भविष्याचे चांगले नियोजन करता येईल. प्रकृतीची पथ्ये पाळा. ज्येष्ठांचा सल्ला माना. जोडीदाराची साथ मिळेल.

कुंभ – पत, प्रतिष्ठा जपा

ग्रहमान पाहता आपली सामाजिक पत व प्रतिष्ठा जपण्याचा आपण विशेष प्रयत्न करणे आवश्यक व गरजेचे असणार आहे. विरोधकांबाबत आपण चिंता करू नये. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रवासाचे योग संभवतात. सकारात्मक दृष्टीने वागण्याचा प्रयत्न केल्यास पुष्कळ गोष्टी साध्य करणे शक्य होऊ शकेल. कायदा व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. काळानुसार आपण बदलण्याची तयारी ठेवणे हितकारक ठरू शकते. उदारमतवादी धोरण अवलंबू नका. अडचणींतून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. प्रकृती जपा. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन – वरिष्ठांशी जुळ‌वून घ्या

या आठवड्यात नोकरदारांनी आपल्या वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारल्यास मनाप्रमाणे काही गोष्टी सफल होणे शक्य आहे. व्यापार व आर्थिक व्यवहारात सावधतेचा इशारा असून याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल. काही जुने येणे वसूल होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी घरच्यांना विश्वासात घेणे इष्ट राहील. खर्चाच्या बाबतीत अधिक हिशोबी राहणे आवश्यक राहील. कार्यक्षमतेला ताण देण्याचे टाळल्यास मानसिकता चांगली ठेवता येईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here