हायलाइट्स:
- उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२
- पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या दौऱ्यावर
- आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण
देहरादून विमानतळावर उत्तराखंडचे राज्यपाल रिटायर्ड लेफ्टनंट जनरल गरुमीत सिंह आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित झाले होते.
केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींनी शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. केरळमध्ये जन्मलेल्या आदि शंकराचार्यांनीच केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता होता. केदारनाथमधील शंकराचार्यांची मूर्ती १२ फूट उंच आहे तर या मूर्तीचं वजन तब्बल ३५ टन आहे.
यावेळी पंतप्रधानांनी शंकराचार्यांच्या समाधीस्थळाचंही प्रक्षेपण केलं. हे समाधीस्थळ २०१३ च्या जलप्रलयात उद्ध्वस्थ झालं होतं.
आदि शंकराचार्यांच्या मूर्तीच्या अनावरणानंतर पंतप्रधान मोदींनी केदारनाथमध्ये १३० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. तसंच ४०० कोटी रुपयांहून अधिक कार्यांचं लोकार्पण आणि पायाभरणी केला.
LIVE PM Narendra Modi at Kedarnath : पंतप्रधान मोदींचा उत्तराखंड दौरा
मुख्यमंत्री धमिही उपस्थित
या दरम्यान पंतप्रधानांसोबत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत आणि सद्य मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित आहेत. उल्लेखनीय म्हणजे, याच आठवड्यात माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि कॅबिनेट मंत्री धन सिंह रावत यांच्यासहीत भाजप प्रदेशाध्यक्षांचा केदारनाथमध्ये जोरदार विरोध करण्यात आला. तब्बल सात तास केदारनाथ धाममध्ये राहूनही माजी मुख्यमंत्री रावत यांना पुरोहितांनी दर्शनाचीही संधी मिळाली नाही. जानेवारी २०२० मध्ये त्रिवेंद्र सिंह रावत सरकारनं चार धाम देवस्थानम बोर्ड गठीत केलं होतं. यावेळी, चार धामसहीत तब्बल ५१ इतर मंदिरांचं नियंत्रण राज्य सरकारकडे आलं. उत्तराखंडात केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि ब्रदीनाथ असे चार धाम आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या हातातले अधिकार काढून घेतल्याचं सांगत पुरोहित आणि पंडा सामाजाकडून भाजप सरकारचा जोरदार विरोध करण्यात आला. यानंतर पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचाही विरोध करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर, बुधवारी स्वत: उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केदारनाथमध्ये दाखल होत पुरोहितांची मनधरणी करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times