हिंगोली : दिवाळीचा सण म्हटलं की नात्यांचा सण असतो. या सणाला घरातले सगळे एकत्र येत आनंदोत्सव साजरा करतात. पण याच आनंदाला हिंगोलीमध्ये मात्र धक्का बसला आहे. हिंगोलीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला पडला. भीषण अपघातामध्ये सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोठी बहीण-मामा हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील ही घटना आहे. दिवाळीसाठी मामाकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये आदर्श अरविंद सुरय्या वय वर्ष ९ आणि कीर्ती अरविंद सुरय्या वय वर्ष ८ या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता नांदेड हलवण्यात आलं आहे.
घरासमोर फटाके फोडण्याचा जाब विचारताच तिघांनी शिवीगाळ करत केली मारहाण
टाकळगाव येथून वसमतकडे येणाऱ्या टाटा एस मॅजिक पिकप क्रमांक MH 22 AA 16 यांनी मोटर सायकल MH 26 U 2957 ला जोरदार धडक दिली. त्यामुळे बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला तर सोबतच आलेल्या मामा राजू खिलारे वय वर्ष 24 व मृत्यू झालेल्या मुलांची मोठी बहीण आरती अरविंद सुरय्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वसमत तालुक्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रात्री उशिराच्या सुमारास घडली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here