हायलाइट्स:

  • तृणमूलचे नेते सुब्रत मुखर्जी यांचं निधन
  • हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तृणमूलसहीत विरोधी काँग्रेस, भाजपच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला

कोलकाता: पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रत मुखर्जी यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालंय. कोलकातातल्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी सुब्रत मुखर्जी ७५ वर्षांचे होते.

ऑक्टोबर महिन्यात सुब्रत मुखर्जी यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीनं कोलकाताच्या ‘शेठ सुखलाल कर्नानी मेमोरियल रुग्णालयात’ (SSKM) दाखल करण्यात आलं होतं. मुखर्जी यांना हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. त्यांची तब्येतही सुधारताना दिसून येत होती. परंतु, गुरुवारी अचानक उपचारादरम्यान पुन्हा एकदा त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का जाणवला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

मुखर्जी यांची तब्येत बिघडल्याचं समजताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. परंतु, इथेच त्यांना मुखर्जी यांच्या मृत्यूची बातमी मिळाली.

‘आयुष्यात मी अनेक दु:ख पाहिली परंतु, हे माझ्यासाठी सर्वात मोठं दु:ख आहे. सुब्रत मुखर्जी यांची तब्येत स्थिर असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली होती, म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्याचं’ ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.

Kailash Vijayvargiya: ‘तृणमूल’मध्ये प्रवेशासाठी नेत्यांना धाकदपटशा, भाजप नेत्याचा आरोप
LIVE PM Narendra Modi at Kedarnath : पंतप्रधान मोदींचा उत्तराखंड दौरा

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसहीत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासहीत अनेक नेत्यांनी सुब्रत मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सुब्रत मुखर्जी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील पंचायतराज विभागाचे मंत्री होते. तसंच सुब्रत मुखर्जी हे कोलकाताच्या महापौरपदी वर्णी लागलेले तृणमूलचे पहिले नेते होते.

सुब्रत मुखर्जी हे तृणमूलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते.

Modi at Kedarnath : काल सैनिकांसोबत दिवाळी, आज सैनिकांच्या जन्मभूमीवर : पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi at Kedarnath : केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here