हायलाइट्स:

  • भाजप खासदाराचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल
  • जांगडा यांच्या उद्घाटन कार्यक्रमात शेतकरी आंदोलकांचा गोंधळ
  • आंदोलकांसमोर पोलीस दलही पडलं अपुरं

हिस्सार, हरियाणा : केंद्रानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध सुरूच आहे. अशातच हरयाणात शेतकरी आंदोलकांनी भाजप नेत्यांना सळो की पळो करून सोडलंय. या दरम्यान, भाजप नेते वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांचा आणखीन रोष ओढावून घेताना दिसत आहेत. शुक्रवारी शेतकरी आंदोलकांनी भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करताना त्यांना काळे झेंडे दाखवले. जांगड यांनी आंदोलकांचा उल्लेख करताना त्यांना ‘बेरोजगार darude‘ म्हटलं होतं.

आज शुक्रवारी, भाजप राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा हिसामध्ये एका धर्मशाळेच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. याची खबर शेतकरी आंदोलकांना लागताच ते इथं उपस्थित झाले आणि त्यांनी खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यातच, एकीकडे भाजप कार्यकर्ते खासदार जांगडा यांच्यासाठी ‘जिंदाबाद’च्या घोषणा देत होते. तर दुसरीकडे शेतकरी ‘मुर्दाबाद’च्या घोषणा देऊन त्यांचा विरोध करत होते.

या दरम्यान मोठ्या संख्येत पोलीस दलही तैनात करण्यात आलं होतं. पोलिसांनी चारही बाजुंनी बॅरिकेडस् उभारून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला. परंतु, घटनास्थळी शेतकरी आंदोलक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्यानं पोलीस दलही त्यांच्यासमोर कमी पडल्याचं दिसून आलं. या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये उडालेल्या गोंधळात भाजप खासदाराच्या गाडीच्या काचाही फोडल्या गेल्या. या घटनेसाठी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलंय.

Bihar: बिहारमध्ये ऐन दिवाळीत विषारी दारुमुळे ३१ जणांनी गमावला जीव
Spurious Liquor in Bihar: ‘गडबड चीज पीएंगे तो…’, मुख्यमंत्री नितीश कुमारांचं वक्तव्य वादात

खासदार महाशयांचं वादग्रस्त वक्तव्य

गुरुवारी रोहतकमध्येही एका कार्यक्रमासाठी पोहचलेल्या भाजप खासदार जांगडा यांना जोरदार विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. शेतकऱ्यांना ‘बेरोजगार दारुडे’ म्हणत असल्याचा खासदार महाशयांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांचा शेतकऱ्यांकडून निषेध करण्यात येतोय.

‘कृषी कायद्याला कुणाचाही विरोध नाही. विरोध करणाऱ्यांत गावातील बेरोजगार दारुड्यांचा भरणा आहे. यात कुणीही शेतकरी नाही. केवळ असामाजिक तत्त्वांचा यात भरणा आहेत, यांचा सामान्य लोकही विरोध करत आहेत. अशा प्रकारचं कृत्यं करणारे वाईट लोक आहेत. नुकतंच सिंघु सीमेवर काही निहंग्यांद्वारे एका निर्दोष व्यक्तीच्या हत्येनं या वाईट लोकांचा खरा चेहरा समोर आणला आहे. मी नियमितरित्या दिल्लीला जात असोत आणि पाहतो की बरेचसे तंबू रिकामेच पडलेले आहेत. लवकरच या समस्येवर उपाय सापडेल’, असं वक्तव्य करताना जांगड या व्हिडिओत दिसत आहेत.

Fuel Prices: ‘भीतीमुळेच भाजपनं घेतला इंधन दरकपातीचा निर्णय, योग्य प्रत्यूत्तर मिळेल’
Modi at Kedarnath : काल सैनिकांसोबत दिवाळी, आज सैनिकांच्या जन्मभूमीवर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here