नाशिक : नाशिकच्या मनमाडमध्ये भाऊबीजेच्या दिवशी भावाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनमाडच्या रेल्वे स्थानकामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे स्थानकावर रेल्वे प्रवासी असताना सगळ्यांसमोर हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यात शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम पवार असं युवकाचे नाव असून त्याला तीन बहिणी आहेत. भाऊबीजेच्या दिवशी ही हत्या झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर म्हणजे जेव्हा शिवमची हत्या झाली तेव्हा मुलगी देखील त्या ठिकाणी होती. संबंधित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या हत्याकांडामागे नेमकं काय कारण आहे? याचा उलगडा पोलीस करत आहेत.
Weather Alert : मुंबईसह राज्यभर मुसळधार पाऊसाची हजेरी, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
दरम्यान, ही हत्या का झाली? या हत्येमागे कोणाचा हात होता याची पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे तर दिवाळीच्या सणांमध्ये अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे तर आरोपीस कठोर शिक्षा व्हावी याची मागणी कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here