सकाळी आठनंतर नाशिककरांना सूर्यदर्शन घडले. तर, पहाटेपासून वातावरणात दमटपणा जाणवत असून, आजही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात गेली दोन ते तीन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रमधील काही जिल्ह्यांचा समावेश होता.
दिवाळीत पावसाने अशाप्रकारे हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आगे. भात कापणीची वेळ असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात पाऊस सुरू असून सांगली, कोल्हापूरमध्ये काही भागात सध्या पावसाच्या सरी सुरू आहेत. अधिक माहितीनुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्येही मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असून शेतकर्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी शेतमालाची व्यवस्था करावी असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यात ऐन दिवाळीत पुन्हा एकदा मान्सूनने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times