हायलाइट्स:
- अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासहीत अनेक नेत्यांचाही सहभाग
- विझलेल्या दिव्यांतून तेल गोळा करण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी
अयोध्येतील ‘शरयू पैडी’चे १२ घाट आहेत. या कार्यक्रमात तब्बल १२ हजार स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता. दिवाळीच्या या कार्यक्रमात केवळ दिवे पेटवण्यासाठी तब्बल ३६ हजार लीटर मोहरीच्या तेलाचा वापरण्यात आल्याचा अंदाज आहे.

अयोध्येत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी
अनेक गरीब घरांत मोहरीचं तेल खाण्यासाठीही वापरलं जातं. त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांची विझलेल्या दिव्यांतील तेल गोळा करण्यासाठी झुंबड उडालेली दिसली. या तेलांचा वापर घरी जेवण बनवण्यासाठी वापरण्याचा मानस या नागरिकांनी व्यक्त केला. यासाठी डब्बे आणि बाटल्या भरून नागरिकांनी तेल गोळा केलं.

अयोध्येत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी
मोहरीचं तेल बाजारात तब्बल २०० रुपये लीटर मिळतंय. पण इथं विझलेल्या दिव्यांतील तेल वायाच जाणार आहे. इथं ते मोफत मिळतंय, असं तेल गोळ्या करणाऱ्या नागरिकांचं म्हणणं होतं.
तर करोना संक्रमणकाळात नोकऱ्या आणि मजुरी गमावणाऱ्या अनेकांना महागाईच्या काळात दिवाळी साजरी करणं दूरच पण दररोजचं जेवण मिळवणंही कठीण झालंय.
तेल जमा करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत चालल्याचं पाहून पोलिसांनी या नागरिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानंतरही या गरीबांनी आपल्या गरजेपुरतं का होईना पण दिव्यांतलं तेल गोळा केलंच!
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times