हायलाइट्स:
- सुनील पाटील हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड- मोहित कंबोज.
- सुनील पाटील याचे भाजपचे नेते, मंत्री किरीटसिंह राणा यांच्यासोबत फोटो व्हायरल झाल्याने खळबळ.
- या फोटोत सुनील पाटीलसोबत के.पी. गोसावी आणि मनीष भानुशाली हे देखील दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोत भाजपचे गुजरातचे वनेमंत्री किरीटसिंह राणा यांच्यासोबत सुनील पाटील दिसत आहे.

मंत्री किरीटसिंह राणा यांच्यासोबत सुनील पाटील आणि के. पी. गोसावी.
क्लिक करा आणि वाचा- सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता; तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप
एका फोटोमध्ये मंत्री किरीटसिंह राणा (Kirit Singh Rana) यांत्यासोबत सुनील पाटीलसह अटकेत असलेला च्या. पी.गोसावी (केपी गोसावी)दिसत आहे. एका फसवणुकीच्या प्रकरणात गोसावी हा अटकेत असून कोर्टान त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. या फोटोत सुनील पाटील हा राणा यांना खेटून उभा राहिलेला दिसत असून के. पी. गोसावी राणा यांना फुलाचा गुच्छ देत त्यांचे स्वागत करत असल्याचे दिसत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे; मात्र, वानखेडेही असतील टीमचा भाग
तर आणखी एका फोटोत सुनील पाटील इतरांसह मंत्री किरीटसिंह राणा यांच्यासोबत दिसत आहे. सुनील पाटील व्यतिरिक्त फोटोत असलेल्या इतर व्यक्तींची मात्र ओळख पटलेली नाही.

मंत्री किरीटसिंह राणा यांच्यासोबत सुनील पाटील
तर सुनील पाटील याचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. हा ग्रुप फोटो असून तो सेल्फी आहे आणि हा सेल्फी एनसीबीच्या पंचाचे काम करणारा मनीष भानुशाली याने घेतलेला आहे. या फोटोत एकूण सहा लोक दिसत असून त्यात सुनील पाटीलसोबत मनीष भानुशाली दिसत आहे.

मनीष भानुशालीसोबत सुनील पाटील
क्लिक करा आणि वाचा- Breaking News! समीर वानखेडेंकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेतला
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times