हायलाइट्स:
- राज्याला मोठा दिलासा
- गेल्या काही दिवसांतील निच्चांकी रुग्णसंख्येची नोंद
- मृत्यूंची संख्याही झाली कमी
राज्यात आज ८९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ६४,५८,०४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६ टक्के एवढं झालं आहे.
रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर आता राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. राज्यात आज १० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३१,७५,०५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१६,७६२ (१०.४७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,४८,८८० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ९६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज रोजी एकूण १४ हजार ७१४ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील केवळ चार जिल्ह्यांमध्येच आता चार अंकी रुग्णसंख्या आहे. मुंबईत ३८१९, पुण्यात ३१६३, अहमदनगरमध्ये २०७९ आणि ठाण्यात १६३२ करोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी करोनाचं संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांनी हलगर्जीपणा न करता करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी निर्बंधांचं पालन करण्याची गरज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times