ऑस्ट्रेलियाने २००३ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना ३५९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ २३४ धावांवर सर्व बाद झाला होता आणि ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाला गवसणी घातली होती सध्याच्या सुरु असलेल्या दोन्ही संघांच्या अंतिम फेरीतही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. कारण ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यावर त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके झळकावली आहेत. एलिसा हिलीने तर यावेळी आक्रमक फलंदाजी करत विश्वविक्रमही रचला आहे. त्यामुळे आता २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीची पुनरावृत्ती होणार की भारतीय संघ हे चक्रव्ह्यूह भेदणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
जे कोणत्याही क्रिकेटपटूला जमले नाही ते हिलीने करून दाखवले
महिलांच्या ट्वेन्टी-ृ२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हिलीने एक विश्वविक्रम रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला जी गोष्ट जमली नाही ती गोष्ट हिलीने करून दाखवली आहे.
ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हिलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण हिलीने यावेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळाकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
हिलीने भारताविरुद्धच्या अंतिम फेरीत चौकारानिशी आपले अर्धशतक साजरे केले. हिलीने यावेळी ३० चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. पुरुषांच्या वनडे, ट्वेन्टी-२० किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकाही फलंदाजाला एवढ्या आक्रमकपणे फलंदाजी करता आलेली नाही. त्याचबरोबर महिलांच्या वनडे आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात कोणत्याही खेळाडूला एवढे जलद अर्धशतक झळकावता आलेले नाही.
विश्वविजेत्यावर होणार पैशांची बरसात…
महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम सामन्याला काही मिनिटांतच सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हा विश्वचषक जो संघ जिंकेल, त्यांच्यावर पैशांची बरसात आयसीसी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बऱ्याचदा पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये दुजाभाव केल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. पण यावेळी जो संघ विश्वचषक जिंकेल त्यांच्यावर पैशांची बरसता होणार असल्याचे दिसत आहे.
जो संघ विश्वचषक जिंकेल त्यांना ७.१३ कोटी रुपये मिळणार आहेत, तर जो संघ उपविजेता ठरणार आहे त्यांना ३.५८ कोची रुपये मिळणार आहेत. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या प्रत्येक संघाला १२ लाख रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या संघांना पाच लाख रुपये मिळणार आहेत.
भारतीय महिला संघाने अखेर ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काही वेळातच अंतिम फेरीचा सामना सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय संघासमोर आव्हान असेल ते बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे. पण भारताला ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यांना चांगला खेळ करावाच लागेल. पण त्यापेक्षाही त्यांना एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष द्यावे लागणार आहे. कारण ही गोष्ट केल्यास भारताला विश्वचषक जिंकण्याची एक नामी संधी असेल.
भारतीय संघ पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
एकूण सामने- १९
ऑस्ट्रेलिया- १३ विजय
भारत- ६ विजय
भारताचा स्पर्धेतील प्रवास
गट फेरी
>>ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय
>>बांगलादेशवर १८ धावांनी विजय
>>न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय
>>श्रीलंकेवर सात विकेटनी विजय
उपांत्य फेरी
>>इंग्लंडविरुद्ध पावसामुळे सामना रद्द
ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील प्रवास
गट फेरी
>>भारताकडून १७ धावांनी पराभव
>>श्रीलंकेवर ५ विकेटनी विजय
>>बांगलादेशवर ८६ धावांनी विजय
>>न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय
उपांत्य फेरी
>>दक्षिण आफ्रिकवर ५ धावांनी विजय
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times