हायलाइट्स:
- नीलेश राणेंची गुलाबराव पाटलांवर शिवराळ भाषेत टीका
- राणेंच्या टीकेमुळं जळगावात वातावरण तापलं
- नीलेश राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्याचे शिवसैनिकांना आदेश
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी कव्वाली गायन केले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. याच कव्वाली गायनावरून नीलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवर पातळी सोडून टीका केली आहे. राणेंनी गुलाबराव पाटलांबद्दल बोलताना अत्यंत शिवराळ भाषा वापरली आहे. ‘स्वर्गीय बाळासाहेबांची जास्त आठवण येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे’, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

नीलेश राणे यांचं ट्वीट
नीलेश राणेंच्या टीकेमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात नीलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. त्यानुसार राणेंच्या विरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज दुपारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन शिवसैनिकांनी नीलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.
हॅशटॅग गुलाबभाऊ समर्थक
नीलेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर शिवसैनिकांकडून हॅशटॅग वापरून गुलाबभाऊ समर्थक व संतप्त शिवसैनिक हा ट्रेंड सुरू झाला आहे. तसेच सोशल मीडियावरून नीलेश राणे यांनी केलेल्या ट्विटचा निषेध देखील व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा:
‘शाहरुख खानला आजही धमकावलं जातंय; त्याला सांगितलं जातंय की…’
भाऊबीज! ‘हे’ दृश्य पाहून तुम्ही सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना सॅल्यूट कराल!
समीर वानखेडेंनी मुंबई शहराला ‘पाताळ लोक’ बनवून टाकलंय: नवाब मलिक
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times