हायलाइट्स:

  • शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
  • शरद पवार यांच्यासह सहकारातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
  • नागवडे यांच्या कार्याचा गौरव

अहमदनगर : ‘राजकारण आम्हीही करतो, मात्र सामान्यांच्या भल्याच्या आड येईल असले राजकारण आम्ही करत नाही. सहकारी संस्थांच्या कारभारात काही घटना घडल्या असतीलही, मात्र त्यावर चर्चेतून मार्ग काढू. सहकारात वाद निर्माण होऊ न देता यावर अवलंबून असलेल्यांच्या विकासावर भर दिला पाहिजे,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारातील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत दिला.

श्रीगोंदा फॅक्टरी येथील नागवडे सहकारी साखर कारखान्यावर या कारखान्याचे संस्थापक राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते. या कार्यक्रमासाठी सहकारातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

ड्रग्जबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं मोठं वक्तव्य; नक्की काय म्हणाले?

यावेळी शरद पवार यांनी नागवडे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, स्व. नागवडे यांनी बेलवंडी येथील खासगी साखर कारखाना विकत घेऊन त्याचे पुनरुज्जीवन केले. मी १९७८ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, त्यावेळी नागवडे यांनी मला चांगली साथ दिली. त्यांचा सहकारातील अभ्यास मोठा होता. त्याचा फायदा या भागाला झाला. त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून शिक्षणाचंही जाळे विस्तारलं. नागवडे कारखान्याने सहवीजनिर्मिती व इथेनॉल प्रकल्प सुरू केले आहेत. त्या दोन्ही प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना प्रतिटन दोनशे रुपयांचा अधिकचा बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.

अहमदनगरमधील दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले की, नागवडे यांचे काम जवळून पाहता आले. साखर संघाच्या एकाही बैठकीला ते कधी गैरहजर राहिले नाहीत. त्यांनी राज्यातील सहकारी कारखानदारी वाढवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, नागवडे त्यांच्या समवयस्क पिढीने जिल्हा सांभाळला व वाढवला. त्यांनी सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कुकडी कारखान्याच्या उभारणीला अगदी मोठ्या मनाने होकार दिला, म्हणून कुकडी कारखाना उभा राहिला. त्यांनी कधीही राजकारणासाठी कारखान्याचा वापर केला नाही.

दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार बबनराव पाचपुते यांचीही भाषणे झाली. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार निलेश लंके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंखे, ज्ञानदेव वाफारे, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here