तेलंगण: सन २०२८ मध्ये ऑनर किलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी याचा मृतदेह हैदराबाद येथे आढळला आहे. खैरातबाद येथील आर्य वैश्य भवनात रुम नंबर ३०६ मध्ये त्याचा मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटली असून या प्रकरणाचा तपशील उलगडला नसल्याचे पोलिस सहआयुक्त वेणु गोपाळ रेड्डी यांनी सांगितले. राव हैदराबादमध्ये कशासाठी आला होता हे देखील अद्याप स्पष्ट झाले नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. वैश्य या उच्च समजल्या जाणाऱ्या समाजातील राव याच्या मुलीने एका दलित तरुणाशी लग्न केले होते.

मारूती राव याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर, तसेच या प्रकरणातील तपासानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.

दरम्यान, आपण मारुती राव याच्याशी प्रणयची हत्या झाल्यापासून एकदाही बोललो नसल्याची प्रतिक्रिया हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

सप्टेंबर २०१८ मध्ये अमृताचा पती आणि आपला जावई प्रणय पेरुमल्ला याला मारण्यासाठी मारुती राव याने १ कोटी रुपयांची सुपारी दिली होती, असा त्याच्यावर आरोप होता. दलित समाजातील तरुण प्रणय पेरुमल्लाने राव याची मुलगी अमृता हिच्याशी लग्न केले होते. आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचे राव याला जराही रुचले नव्हते. अमृता ही वैश्य समाजाची असून प्रणय हा माला या दलित समाजातील होता. आपल्या मुलीने एका दलित तरुणाशी लग्न केल्याचा मोठा राग मारुती राव याच्या मनात होता.

प्रणय पेरुमल्ला याची हत्या १४ सप्टेंबर २०१८ या दिवशी करण्यात आली. त्यावेळी अमृता आणि प्रणय दोघे हॉस्पिटलला चालले होते. त्यावेळी अमृतासमोरच प्रणय पेरुमल्ला याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या भीषण हल्ल्यात प्रणय याचा मृत्यू झाला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या हत्येचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here