हायलाइट्स:

  • बहिणीचा पती दुसरं लग्न करणार होता, त्याआधी घडवून आणली हत्या
  • उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील धक्कादायक घटना
  • सैन्यात असलेल्या मेहुण्याने दिली होती हत्येची सुपारी
  • चार आरोपींना केली अटक, मुख्य आरोपीला लवकरच अटक होणार

अमितेश कुमार सिंग, गाझीपूर :

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील जंगीपूर येथे फर्निचर व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. २४ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. मृत जितेंद्र याची हत्या त्याचा मेहुणा अरविंद याने आपल्या नातेवाइकाकडून घडवून आणली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक रामबदन सिंह यांनी सांगितले की, जितेंद्र यादवच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आहे. आरोपी प्रिन्स यादव याने सांगितले की, त्याचा नातेवाइक अरविंद यादव हा सेमरा चक फैज गावात राहतो. त्याच्या बहिणीचं लग्न २०१८ रोजी जितेंद्र यादव याच्यासोबत झालं होतं. घरगुती वादातून जितेंद्र आपल्या पत्नीपासून वेगळे राहत होता. अनेकदा पंचायतीची बैठक होऊनही त्याने पत्नीला घरी नेण्यास नकार दिला होता.

पत्नी आणि मुलाची गळा आवळून केली हत्या, पत्नीचे दागिने तारण ठेवून घेतले कर्ज

यावरून जितेंद्र याचा मेहुणा अरविंद याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दुसरं लग्न करण्याआधीच तुझी हत्या करीन, अशी धमकी अरविंद याने दिली होती. अरविंदने आत्याचा मुलगा प्रिन्स यादव याला जितेंद्रच्या हत्येची सुपारी दिली होती. जितेंद्र दुसरं लग्न करण्याआधी त्याला ठार कर, असे त्याने प्रिन्सला सांगितलं होतं. जानेवारीत जितेंद्र हा दुसरं लग्न करणार होता. त्याची माहिती अरविंदला मिळाली. त्याने फोन करून प्रिन्सला सांगितलं. २४ ऑक्टोबर रोजी प्रिन्स यादव आपल्या तिघा साथीदारांना घेऊन गेला. त्यांनी जितेंद्रच्या गोळ्या घालून त्याची हत्या केली.

मन सुन्न करणारी घटना! फटाके देण्याच्या बहाण्याने नेले, मुलाला पुलावरून नदीत फेकले

पोलीस अधीक्षक रामबदन सिंह यांनी सांगितले की, अरविंद हा सैन्यात आहे. आरोपी प्रिन्स त्याचा आत्याचा मुलगा आहे. अटक केलेल्या चार जणांकडून एक पिस्तुल, दोन जिवंत काडतूस, एक गावठी पिस्तुल, दोन मोटरसायकली आणि पाच मोबाइल हस्तगत केले आहेत. सर्व आरोपी हे बीकापूर गावातील आहेत. अरविंद यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सीआरपीएफ कॅम्पमध्ये जवानानं सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या, चार ठार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here