सोलापूर : सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गुंडासारखे टोळीयुद्ध सुरु असून जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दोन्ही सरकारांचं दुर्लक्ष होत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलीय. ते सोलापूरात बोलत होते.

आज दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. यावर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलणे अपेक्षित असताना ते भलत्याच कामात व्यस्त आहेत अशी टीकाही शेट्टी यांनी केली आहे. बिघडलेल्या नटांची बिघडलेली पोरं गांजा ओढतात. यावर सध्या चर्चा सुरू आहे. पण इथे महापुरात बुडालेला शेतकरी, अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी, ऊस बिल न मिळाल्याने आंदोलन करणारा शेतकरी यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे सध्या लक्ष नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे.

सरकारं गुंडांच्या टोळ्याप्रमाणे एकमेकांना बघून घेण्याची भाषा करत आहेत. दिवाळीच्या काळात रस्त्यावर येत बेवारशासारखं शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात हीच शरमेची गोष्ट आहे. वास्तविक १४ दिवसात ऊस बिले अदा करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. सरकार शेतकऱ्यांना संरक्षण द्यायला कमी पडत आहे. ही शरमेची गोष्ट आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
5 Years of Demonetisation: ‘मोदीजी, आता तुम्हीच सांगा, कुठल्या चौकात येऊ?’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here