हैदराबाद: तेलंगणमधील एका खासगी शाळेत ११ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. विद्यार्थिंनींवर बलात्कार करण्यापूर्वी तो विद्यार्थिनींना दारू पाजत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. हा वरचेवर शाळेच्या परिसरात दारू पित असे अशी माहितीही पोलिस तपासात उघड झाली आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने हैजराबादमध्ये खळबळ उडाली आहे.

शाळा बंद झाल्यानंतर हा २६ वर्षीय आरोपी शिक्षक काही विद्यार्थिनींचे वेगळे वर्ग घेत असे, असे वानापार्थी पोलिसांनी माहिती देताना सांगितले. दरम्यानच्या काळात तो उपस्थित विद्यार्थिनींपैकी एकीची निवड करत असे. त्या नंतर हा शिक्षक निवडलेल्या विद्यार्थिनीला दुसऱ्या खोलीत नेत असे आणि मग तिच्यावर तेथे बलात्कार करत असे. हा शिक्षक एकतर शाळेतील विद्यार्थिनीवर किंवा मग त्याच्या खासगी शिकवणी वर्गाला येणाऱ्या विद्यार्थिनीला आपली शिकार बनवत असे.

पीडित मुलींपैकी दोघींनी त्यांच्यासोबत घडलेला सारा प्रकार जेव्हा आपल्या कुटुंबीयांना सांगितला, तेव्हा हा अमानुष प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी या शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सामाजिक भीतीपोटी हे कुटुंबीय सुरुवातीला पोलिसांत तक्रार दाखल करायला धजावत नव्हते. गावातील ज्येष्ठांनी यात लक्ष घातल्यानंतर देखील उर्वरित पीडित विद्यार्थिनींचे कुटुंबीय अजूनही तक्रार दाखल करण्यास तयार नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हा आरोपी विद्यार्थिनींवर किती दिवसांपासून अत्याचार करत होता याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. तसेच, या कृत्याच आणखी कुणाचा सहभाग आहे का, याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही.

आरोपी शिक्षकाने पीडित मुलींना परीक्षेच्या वेळी मदत करणे, पेपर फोडणे आणि गुरुकुलमध्ये अॅडमिशन देण्याचे आमिष दाखवले होते,असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनींना खोट्या आश्वासने देत त्यांची फसणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे वानापार्थीचे पोलिस उपायुक्त किरण कुमार यांनी माहिती देताना सांगितले. आपल्या सोबत होत असलेल्या प्रकाराबाबत मी कुणाला काही सांगणार नाही, अशी शपथही या आरोपी शिक्षकाने पीडित विद्यार्थिनींना दिली होती. तरीही जर कुणी याबाबत कुणाला सांगितले तर आपण तिला परीक्षेत मदत करणार नाही, अशी धमकीही त्याने पीडित विद्यार्थिनींना दिली होती.

हा आरोपी शिक्षक आपल्या चुलतीच्या घरात राहात होता. त्याला अटक होईपर्यंत त्याच्या चुलतीलाही त्यांच्या या काळ्या कृत्याबाबत काहीही माहिती नव्हती. काही विद्यार्थिनींवर त्याने चुलतीच्या घरातही बलात्कार केले असावे असा संशय पोलिसांना आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here