हायलाइट्स:

  • राजस्थानच्या भरतपूरमध्ये धक्कादायक घटना
  • शेजारच्यांनी बापलेकाची गोळ्या घालून केली हत्या
  • घरी आलेल्या पाहुण्याने कानाखाली मारल्याच्या रागातून केले कृत्य
  • दोघांपैकी एका आरोपीला पोलिसांनी घटनास्थळाहून केली अटक

भरतपूर: राजस्थानच्या भरतपूरच्या सुभाष नगरमध्ये रविवारी क्षुल्लक वादातून दोघा भावांनी शेजारील बाप-लेकाची घरात घुसून हत्या केली. आरोपींनी त्यांच्या घरात घुसून दोघांवर गोळीबार केला. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. आरोपी मृताच्या घराबाहेर निघताना या व्हिडिओत दिसत आहेत. एका व्यक्तीच्या हातात शस्त्रदेखील आहे.

मृताचा भाऊ चंदन याने सांगितलं की, त्याचा लहान भाऊ सुरेंद्र हा सुभाष कॉलनीत राहतो. सुरेंद्रचा भाऊ सचिन भरतपूरला राहत असून, एनडीएची तयारी करत होता. शनिवारी संध्याकाळी उशिरा सुरेंद्र याच्या घरी त्याच्या नातेवाइकाचा मुलगा आला होता. सुरेंद्रच्या नातेवाइकाच्या मुलाचे शेजारील लाखन याच्याशी कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. यावर सुरेंद्रच्या नातेवाइकाच्या मुलाने लाखनच्या कानाखाली मारली होती आणि तेथून पसार झाला होता.

घटनेनंतर लाखनने काही वेळाने सुरेंद्रच्या घरावर गोळीबार केला होता. मात्र, सुरेंद्र आणि त्याचा मुलगा सचिन घराबाहेर निघाला नाही. शनिवारी लाखनने गोळीबार केल्याची माहिती सुरेंद्रच्या कुटुंबीयांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यांनी कुणालाही ताब्यात घेतले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून ते निघून गेले. जर पोलीस रात्री उशिरापर्यंत थांबले असते आणि आरोपींना अटक केली असती तर दोघेही आज जिवंत असते, असा आरोप स्थानिकांनी केला.

कुटुंब बाहेरगावी गेलं होतं, बंगल्यावर पोहोचल्यानंतर ‘ते’ दृश्य बघून हादरलेच!

शनिवारी रात्री गोळीबार झाल्यानंतर रविवारी सकाळी सुरेंद्रच्या घराजवळ काहीतरी काम सुरू होतं. त्याचवेळी लाखन आणि त्याचा भाऊ दिलावर तिथे उपस्थित होते. त्यावेळी सुरेंद्र आणि लाखन यांच्यामध्ये पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर लाखन घरात गेला आणि घरातून येताना त्याने पिस्तूल आणले. त्यातून त्याने सुरेंद्र यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळी सचिनही घरी येत होता. त्याने लाखनचा प्रतिकार केला असता, त्यालाही गोळ्या घातल्या आणि घटनास्थळावरून तो फरार झाला. बापलेकाची हत्या केल्यानंतर लाखन आणि दिलावर दोघेही पळून जात होते. त्यावेळी दिलावरच्या पायाला दुखापत झाली. पोलिसांनी दिलावरला घटनास्थळावरच अटक केली. त्याला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस अधीक्षक देवेंद्र विश्नोई यांच्या आदेशानंतर आरोपी दिलावरला रुग्णालयातून तुरुंगातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

तरुणींसोबत कॉलवर बोलताना बनवायचे अश्लील व्हिडिओ; असा झाला पर्दाफाश

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here