हायलाइट्स:
- सुकमा जिल्ह्यातील लिंगमपल्ली गावातील घटना
- चार जवानांनी गमावले प्राण, तीन जण गंभीर जखमी
- आरोपी जवानाचं मानसिक संतुलन ढासळल्यानं घडली घटना, अधिकाऱ्यांची माहिती
सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव रितेश रंजन असल्याचं समजतंय.
PHOTO: प्रदूषणानं फेसाळलेल्या यमुनेच्या पाण्यात श्रद्धेची डुबकी!
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील लिंगमपल्ली गावात स्थित सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या शिबिरात ही घटना घडली.
प्राथमिकदृष्ट्या, भावनात्मक तणावाखाली असलेल्या कॉन्स्टेबल रितेश रंजन या जवानानं अचानक आपलं मानसिक संतुलन गमावलं आणि रागाच्या भरात आपल्या सहकाऱ्यांवर एके ४७ रायफलमधून गोळ्या झाडल्या, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
सीआरपीएफच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलानं घटनेमागच्या विस्तृत कारणं शोधून काढण्याचे तसंच उपचारात्मक उपाय सुचवण्याचे आदेश दिले आहेत.
सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (DIG), ५० व्या बटालियनचे कमांडन्ट आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर उपस्थित आहेत.
जखमींना आवश्यक ते उपचार पुरवण्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच ज्या जखमींना अतिरिक्त उपचाराची आवश्यकता आहे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी दिलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times