हायलाइट्स:

  • गैर-भाजपशासित राज्यात गेल्या वर्षीचं जवळपास पाच लाख टन धान्य पडून
  • केंद्राचा धान्य खरेदीसाठी नकार
  • पण, राज्यातील भाजप नेत्यांकडून शेतकऱ्यांना धान्य खरेदीचं आश्वासन

हैदराबाद: भाजपच्या दुपट्टीपणावर निशाणा साधत जनतेला खोटी स्वप्न दाखवणाऱ्या भाजप नेत्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपला राग व्यक्त केलाय.

सैल बोलणे‘ करणं टाळा अन्यथा जीभ कापून टाकू, असा इशाराच यावेळी मुख्यमंत्री राव यांनी राज्यातील भाजप प्रमुख बंदी संजय कुमार यांना दिलाय.

रविवारी धान्य खरेदीच्या मुद्यावर मीडियाशी बोलताना भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी आपला संताप व्यक्त केला तसंच केंद्रातील भाजपला निशाण्यावर घेतलंय.

राज्यातील भाजपचे नेते संजय बांडी तेलंगणाच्या शेतकऱ्यांना धान्याची शेती करण्याचा सल्ला देत आहेत. तसंच त्यांची पिकं खरेदी करण्याचं खोटं आश्वासनही ते शेतकऱ्यांना देत आहेत, असं म्हणतानाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोपामागचं कारणही स्पष्ट केलं.

शेतकरी आंदोलन: सत्यपाल मलिकांच्या भाषणात इंदिरा गांधींच्या हत्येचा उल्लेख
Chhattisrgarh: CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, कारण आलं समोर…
‘केंद्रानं धान्य खरेदी करणार नसल्याचं सांगितलंय. याच कारणामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तोटा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी इतर पिकं घेण्याचा सल्ला दिलाय. राज्यानं खरेदी केलेले तांदूळ घेण्यासाठी मी थेट केंद्रीय मंत्र्यांना जाऊन भेटलो होतो. तेव्हा त्यांनी लवकरच याबद्दल निर्णय घेऊन सूचना देऊ असं म्हटलं होतं. मात्र, आतापर्यंत त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. तेलंगणा राज्याकडे अगोदरपासूनच गेल्या वर्षीचं जवळपास पाच लाख टन धान्य पडून आहे. परंतु, हे धान्य खरेदी करण्याची केंद्राची तयारी नाही. केंद्राचा हा व्यवहार अतिशय बेजबाबदार आहे’, असा संताप मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

केंद्राकडून सांगितलं जातंय की धान्य खरेदी केली जाणार नाही. मात्र, राज्यातील भाजप प्रमुख शेतकऱ्यांना धान्य खरेदीचं आश्वासन देत आहेत. ‘राज्य सरकारबद्दल गैरजरुरी आणि बेजबाबदार वक्तव्य केलीत तर जीभ कापून टाकू’ असा सज्जड दमच मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांना भरलाय.

बांडी संजय म्हणतात की ते मला तुरुंगात धाडणार आहेत. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी मला हात लावून दाखवावाच, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बांडी यांना निशाण्यावर घेतलं.

‘हे लोक शेतकऱ्यांवर गाड्या चढवत आहेत. एका भाजप मुख्यमंत्र्यानं शेतकऱ्यांना मारहाण करण्याचीही स्पष्ट सूट दिलीय’, असं म्हणत मुख्यमंत्री राव यांनी कृषी कायद्याविरोधात सुरू असेलल्या शेतकरी आंदोलनावर आणि भाजपच्या नीतीवर टीका केलीय.

राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला ‘पद्म’ पुरस्कार वितरण सोहळा, देश-विदेशातील ११९ मान्यवरांचा सन्मान
LK Advani birthday: मोदी-शहांनी असा साजरा केला लालकृष्ण अडवाणींचा वाढदिवस!

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here