नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तानं भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय हवाईदलामध्ये सामील झालेल्या पहिल्या महिला पायलट टीम भावना कांत, मोहना जितरवाल आणि अवनी चतुर्वेदी यांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव केला. अतिशय कठोर मेहनत आणि कष्ट यांच्या जोरावरच आपण इथपर्यंत उड्डाण घेतल्याची भावना या महिला पायलटसनं व्यक्त केली.

वाचा :

२०१८ साली भारतीय हवाईदलात म्हणून रुजू झालेल्या मोहना जितरवाल, अवनी चतुर्वेदी आणि भावना कांत यांना नारी शक्ती पुरस्कारानं गौरविण्यात आलं. या तिघींनीही २०१८ मध्ये विमानासहीत हवेत झेप घेण्याची कामगिरी केली होती.

मी भारतीय वायुसेनेचे आभार मानते की आम्हाला फायटर पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा, हाच माझा लोकांसाठी संदेश असेल, असं फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह जितरवाल यांनी म्हटलं.

तर, हा पुरस्कार म्हणजे आमच्या मेहनतीला मिळालेलं फळ आहे. यामुळे आमच्या कामाला निश्चितच प्रेरणा मिळते. ज्या महिलांना भविष्यात काहीतरी बनण्याची इच्छा आहे, त्यांनाही यामुळे बळ आणि प्रोत्साहन मिळेल, असं फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत यांनी म्हटलं.

फ्लाईट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी यांनीही, आपल्यासाठी तुम्ही जे काही करीअर निवडाल त्यासाठी खूप मेहनत घ्या आणि आपला संकल्प दृढ राखा. केवळ याचमुळे तुम्ही तुमच्या मार्गातले अडथळे दूर करू शकाल, असं म्हणत महिलांना प्रोत्साहन दिलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here