मुंबई- सतीश राजवाडे दिग्दर्शित “समांतर” या वेब सिरीजचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. या वेबसीरिजच्या निमित्ताने सतीश राजवाडे आणि स्वप्नील जोशी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे या सीरिजमधून स्वप्नील वेब विश्वात पदार्पण केलं आहे.

टीझरमध्ये स्वप्नील कुमार महाजन ही भूमिका साकारताना दिसते. यात तो स्प्लिट पर्सनॅलिटी या मानसिक आजाराचा शिकार असून, सुदर्शन चक्रपाणी अशा त्याच्या मनाने तयार केलेल्या व्यक्तीला कुमार शोध घेत आहे की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडत आहे.

नेमका कुमार महाजन आहे तरी कोण आणि तो नक्की सुदर्शन चक्रपाणीला का शोधतोय असे प्रश्न स्वप्निलच्या चाहत्यांना पडले आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं तर समांतर सीरिज पाहिल्यानंतरच मिळतील. या वेबसिरीजचा ट्रेलर ९ मार्चला प्रदर्शित होणार असून स्वप्नील जोशी सोबत या सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here