द्वारा संपादित | महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अपडेट केले: 9 नोव्हेंबर 2021, सकाळी 11:08

Mumbai House Collapse: मुंबईतील अँटॉप हिल परिसरात पत्र्याचं छत असलेलं एक मजली घर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईतील घर कोसळले

मुंबईत घर कोसळलं

हायलाइट्स:

  • मुंबईतील अँटॉप हिल परिसरात दुर्घटना
  • एक मजली घर कोसळून ९ जण जखमी
  • जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई :अँटॉप हिल (अँटॉप हिल हाऊस कोसळणे) येथील जय महाराष्ट्र नगरमध्ये एक मजली घर कोसळल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांना सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत सात जणांची सुटका करण्यात आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं आसपासच्या रहिवाशांमध्येही घबराट पसरली आहे. ही घटना नेमकी कशामुळं घडली हे कळू शकलेलं नाही. अँटॉप हिल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा:

एसटी संपाविरोधात राज्य सरकार आक्रमक; ‘हा’ निर्णय घेतला जाण्याची शक्यता

फडणवीस आज कोणता बॉम्ब फोडणार? नीरज गुंडेंच्या ट्वीटमुळं उत्सुकता वाढली!

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: मुंबईच्या डोंगराळ भागात घर कोसळून ९ जण जखमी
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here