हायलाइट्स:
- ठाण्यात धक्कादायक घटना, वृद्धेवर अत्याचार
- सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाचे कृत्य
- पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला केली अटक
- चौकशीत सुरक्षा रक्षकाने दिली गुन्ह्याची कबुली
आरोपी हा गेल्या काही महिन्यांपासून या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. या सोसायटीच्या फ्लॅटमध्ये पीडित महिला ही एकटीच राहते. या महिलेचे नातेवाइक आठवड्यातून दोन वेळा तिला भेटण्यासाठी घरी येतात, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सोसायटीच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहणारी पीडित वृद्ध महिला ३ नोव्हेंबर रोजी शेजाऱ्यांना रडत असताना दिसून आली. तिने स्वतःलाच इजा करून घेतली असावी किंवा अन्य काही कारण असल्याचा अंदाज त्यांनी लावला. वेदना असह्य होत असल्याने ती खूपच रडत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनीच पीडित महिलेला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, शारीरिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी या घटनेचा तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी सोसायटीतील काही व्यक्तींकडे चौकशी केली. त्याचवेळी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावरही संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक करून स्थानिक कोर्टात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित महिला ही सध्या तिच्या नातेवाइकांकडे असून, तिची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times