महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज़: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी बसेसची चांदी, ट्रॅव्हल्सचे दर अचानक वाढवले – parbhani news st workers strike rise in the prices of private buses and travel
परभणी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संपाचा परभणीत शंभर टक्के परिणाम जाणवत आहे. दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या या संपाचा फटका मात्र सामान्य प्रवाशांना बसत असून संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सामान्यांची लालपरी अशी ओळख असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा बंद असल्याने खाजगी बसेसना अचानक मोठी मागणी आल्याने खाजगी बस सेवा देणाऱ्या ट्रॅव्हल्सकडून ट्रॅव्हल्सचे दर अचानक पणे वाढवण्यात आलेत.
यामुळे परभणी येथून नाशिक, पुणे, मुंबई आणि नागपुर आदी शहरांसाठी प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सामान्यांच्या खिशाला बसत आहे. अशा परिस्थितीत हे प्रवाशी मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे असलेले पाहायला मिळत आहे. दुसरीकडे एसटी महामंडळालाही या संपाचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. एकट्या परभणी आगारातून दररोज ५५ बसद्वारे १२० फेऱ्या केल्या जातात. त्यातून दररोज ५ ते ६ लाख उत्पन्न मिळते. एसटी संप: राज्य सरकार आक्रमक; ‘हे’ कठोर पाऊल उचलण्याची शक्यता अकोल्यात दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच
अकोल्यासह राज्यात एसटीचे महाराष्ट्र राज्य शासनात विलीगीकरन करुन शासन नियमाप्रमाणे सर्व सोई- सवलती, वेतन व भत्ते त्वरीत लागू करण्यात यावे, यासाठी राज्यातील सर्वच बस डेपोवर कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आता राज्य परिवहन मंडळाचे विभागीय कार्यालयही संपात उतरले असून, काल पासून विभागीय कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.