हायलाइट्स:

  • वासनांध आरोपीने लहान मुलींवर केले अत्याचार
  • पत्नी गरोदर असल्याने शरीरसंबंध ठेवू शकत नसल्याने केले घृणास्पद कृत्य
  • आरोपीने चौकशीत दिली कबुली, गांधीनगर पोलिसांनी केली कारवाई
  • पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टींचा झाला खुलासा

गांधीनगर: गुजरातमधील गांधीनगरात एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. येथील एका व्यक्तीला तीन लहान मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तीनपैकी एका मुलीची त्याने हत्या केली आहे. विजय असे आरोपीचे नाव असून, पत्नी गर्भवती असल्याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवता येत नव्हते. वासनांध हैवानाने लहान मुलींना लक्ष्य केले, अशी कबुली आरोपीने दिली आहे.

रिपोर्ट्सनुसार, विजयने पोलिसांकडे कबुली दिली की, त्याने सुरुवातीला एका सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी घाबरलेली असल्याने तिने या घटनेची वाच्यता कुठेच केली नाही. त्यानंतर या नराधमाने अन्य दोन मुलींवर अत्याचार केले. हैवान बनलेल्या या नराधमाने केलेल्या कृत्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.

हॉटेलात मटण दिलं नाही, मद्यधुंद पोलिसानं घातला राडा; मालकाला मारहाण

या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, विजयला एक सहा वर्षांची मुलगी आहे आणि त्याची पत्नी सात महिन्यांची गरोदर आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्याने पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवले नाहीत. त्यामुळे हैवान बनलेल्या विजयने मुलींना लक्ष्य केले, अशी माहिती उघड झाली आहे. दहा दिवसांपूर्वी एका मुलीवर त्याने बलात्कार केला. ती विजयला प्रतिकार करू शकली नाही. तसेच तिने याबाबत कुणाकडे सांगितलेही नाही. याचा गैरफायदा घेऊन त्याने इतर दोन मुलींवरही अत्याचार केले.

ठाणे: फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेवर सुरक्षा रक्षकाने केला बलात्कार, आरोपीला अटक

दिवाळीच्या दिवशीही एका पाच वर्षांच्या मुलीला कपडे घेऊन देतो असे सांगून तो सोबत घेऊन गेला. तिच्यावरही त्याने अत्याचार केले आणि तिला तिथेच सोडून पसार झाला. जखमी अवस्थेत सापडलेल्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार सुरू होते. मुलीनेही आरोपीला ओळखले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

एका तीन वर्षांच्या मुलीवरही त्याने अत्याचार केले. एका चौकाजवळ कुटुंब झोपेत असताना, त्याने तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. तिला निर्जन ठिकाणी नेले. तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तिला जाग आल्यानंतर त्याने तिचे तोंड दाबले. यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेनंतर आरोपीचा शोध सुरू केला. आसपासच्या परिसरात पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले. या फुटेजमध्ये विजय दिसून आला. एका ग्रामपंचायतीमध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेजमध्येही आरोपी दिसून आला. त्याची दुचाकीही त्यात होती. त्यानंतर काही ग्रामस्थांच्या मदतीने तसेच इतर तांत्रिक मदतीने आरोपीची ओळख झाली.

तरुणीला बीअर पाजून मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसह चौघांनी केला सामूहिक बलात्कार; दौसा हादरले

गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर चार पोलीस निरीक्षक आणि आठ पोलीस उपनिरीक्षकांसह जवळपास १०० पोलीस कर्मचाऱ्यांची सहा पथके आरोपीचा शोध घेत होते. जर आरोपीला पकडले नसते, तर आणखी काही मुलींना त्याने लक्ष्य केले असते, असे पोलिसांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here