अमरावती : अंजनगाव-अकोट मार्गावरील खाऱ्या नाल्याजवळ झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज याच महामार्गावर अडगाव-नाथवाडी फाट्याजवळ आणखी एक अपघात झाला आहे. दुचाकी व स्विफ्ट डिझायर कारच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील माय-लेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली.
चारचाकी चालक चंदू ना. वानखडे (३५) रा. काकडा हा अपघात होताच तेथून फरार झाला. मृतांचा चुलतभाऊ प्रवीण आजा मावस्कर, रा. पोपट खेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times