नवी दिल्ली: यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले ट्विटर अकाउंट हँडल सांभाळण्याची जबाबदारी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान ७ महिलांकडे सोपवण्यात आली. आज दिवसभर या कर्तृत्ववान महिला #ShelnspiresUs या हॅशटॅगने ट्विट करत आपल्या प्रेरणा देणाऱ्या कथा जगासमोर मांडत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या या आगळ्या भूमिकेचे स्वागत करत आहेत. मात्र, हे स्वागत होत असताना दुसरीकडे एका व्यक्तीने मर्यादा ओलांडत पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटर हँडलचा चक्क पासवर्डच मागितला.

ध्रुव सिंह असे पासवर्ड मागणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे. प्लीज पासवर्ड बता दीजिए अशा शब्दांत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलचा पासवर्डच मागितला.

ज्यावेळी ध्रुव सिंह याने हा पासवर्ड मागितला त्यावेळी पंतप्रधान मोदी यांचे ट्विटर हँडल फूड बँकेच्या संस्थापिका पाहत होत्या. त्याने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मने जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरून उत्तर आले, ‘नवा भारत… लॉगःइनचा प्रयत्न करा’

फूड बँकेच्या संस्थापिका स्नेहा मोहनदास यांनी आपल्या आईकडून प्रेरणा घेऊन बेघरांना अन्न देण्याची सवय लावून घेतली आणि या अंतर्गत त्यांनी सन २०१५ मध्ये फूड बँक इंडियाची स्थापना केली. आतापर्यंत या संस्थेशी शेकडो लोक जोडली गेली आहेत.

ज्या सात महिलांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब बँडलची जबाबदारी सोपवली त्यांमध्ये स्नेहा मोहनदास यांच्या व्यतिरिक्त बॉम्बस्फोटात दोन हात गमावल्यानंतरही प्रेरणादायी काम करणाऱ्यामा मालविका अय्यर, काश्मीरच्या हस्तकलाकार आरिफा, जल संवर्धनासाठी काम करणाऱ्या कल्पना रमेश आणि गोरमाटी कलेचा प्रसार करणाऱ्या महाराष्ट्रातील विजया पवार यांचा समावेश आहे.

यांव्यतिरिक्त स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या कानपूरच्या कलावती देवी आणि महिला शेतकरी आणि सरपंच वीणा देवी यांचाही समावेश आहे. या सर्व महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हँडलद्वारे आपल्या कथा ऐकवत आहेत. तसेच त्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरेही देत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here