हायलाइट्स:

  • मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं
  • आईवडिलांसह बहिणीची हत्या केली
  • पश्चिम बंगालमधील हुगली हादरले
  • तरुणाने स्वतःही आत्महत्येचा केला प्रयत्न

हुगली: पश्चिम बंगालच्या हुगलीमध्ये खळबळजनक घटना घडली. या ठिकाणी तिहेरी हत्याकांड घडले आहे. मुलानेच आधी आपल्या आई-वडिलांची आणि त्यानंतर बहिणीची हत्या केली. त्यानंतर त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी मुलाला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या चौकशीनंतरच या घटनेमागील कारण उघडकीस येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हुगलीच्या ग्रामीण परिसर तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादरले. तरुणाने आईवडिलांची हत्या केल्यानंतर बहिणीचीही हत्या केली. याबाबत माहिती देताना हुगळी ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, सध्या आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णालयातून बरा होऊन बाहेर आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात येईल. त्याची चौकशी केल्यानंतरच त्याने हे कृत्य का केले, याचा उलगडा होईल. पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर आरोपी तरुणाबाबत वेगवेगळी माहिती पोलिसांना मिळाली आहे. विद्यार्थीदशेत असताना तरूण खूप हुशार होता. नोकरी न मिळाल्याने तो खासगी क्लास घ्यायचा. त्यातून त्याला काही पैसे मिळत होते. त्याच्या आई-वडील यांना गंभीर आजार होता. त्यांच्या उपचारासाठी त्याला खर्च करावा लागत असे. उपचारासाठी येणाऱ्या खर्चावरून आईवडील, बहीण आणि तरूणामध्ये वारंवार खटके उडत असत, अशी माहिती समोर आली आहे.

उद्योजक पतीची हत्या, पत्नी थेट पोलीस ठाण्यात हजर; हत्येचं कारण सांगितल्यानंतर…

काही दिवसांपूर्वी त्याची बहीण सुद्धा सासरहून माहेरी आली होती. यानंतर पुन्हा कौटुंबिक वाद झाले. यानंतर तरूणाने आधी आपल्या आईवडीलांची आणि नंतर बहिणीचीही हत्या केली. त्यानंतर आपल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने तरूणाने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती समजते. घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. स्थानिकांनी सांगितले की, तरुणाचे आईवडील गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यानंतर त्याच्या बहिणीलाही मानसिक आजार होता. तिच्या सासरची मंडळी तिच्या उपचारांसाठी काहीही मदत करत नव्हते. तिघांच्या उपचारासाठी तो तरूण सर्व पैसे खर्च करायचा.

काही मिनिटांतच दुचाकी चोरून फरार झाली तरूणी; सीसीटीव्हीत कैद

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here