हायलाइट्स:

  • निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यामुळे कोल्हापुरात रणधुमाळी
  • पाटील विरुद्ध माजी आमदार महादेव महाडिक गटात संघर्ष रंगणार
  • सतेज पाटील यांनी भेटीगाठी घेत प्रचारात मारली बाजी

कोल्हापूर : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यामुळे कोल्हापूर विधान परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील हे मैदानात उतरणार असून त्यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोणीही असला तरी पुन्हा एकदा जिल्ह्यात पाटील विरुद्ध माजी आमदार महादेव महाडिक गटात संघर्ष रंगणार आहे.

विधान परिषद निवडणुकीत सहा वर्षांपूर्वी सतेज पाटील यांनी महादेव महाडिक यांचा पराभव केला होता. तेव्हा महाडिक हे भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले होते तर पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते. तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे महाडिक आणि पाटील यांच्यात जोरदार लढत झाली. या लढतीत पाटील यांनी महाडिक यांचा पराभव केला. आता सहा वर्षानंतर पुन्हा पाटील हे याच स्थानिक स्वराज्य संस्था गटाततून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते पालकमंत्री असल्यामुळे आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. कारण तीन पक्षाची मते सध्या त्यांच्या सोबत आहेत. विरोधात अजूनही भाजपचा उमेदवार ठरलेला नाही.

Nawab Malik: दहशतवाद्याचं घर खरेदी केल्याचा ‘तो’ आरोप; नवाब मलिक म्हणाले…

विधान परिषद निवडणुकीला आता फक्त २० दिवस शिल्लक असताना भाजपच्या उमेदवाराचा पत्ता नसल्यामुळे पहिल्या टप्प्यात सतेज पाटील यांनी भेटीगाठी घेत प्रचारातही बाजी मारलेली आहे. या निवडणुकीत भाजपच्या वतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घरातील उमेदवार असण्याची शक्यता आहे. माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी नकार दिल्यास प्रा. जयंत पाटील यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास सतेज पाटील विरोधात जयंत पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा, लोकसभा आणि गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाडिक आणि पाटील गट आमने-सामने येणार आहेत.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

या निवडणुकीसंदर्भात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अधिसूचना काढण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर तर २४ नोव्हेंबरला छाननी होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असणार आहे. मतदान हे १० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या दरम्यान होणार असून मतमोजणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here