पुणे: कात्रजच्या घाटावर पेटलेला वणवा पाहताच गाडी थांबवून प्रसिद्ध अभिनेते यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा वणवा विझवला. त्यामुळे अनेक झाडे वाचली असून कात्रज टेकडीही वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली आहे.

सयाजी शिंदे आणि नगरसेवक राजेश बराटे हे मार्गे सातारच्या दिशेने निघाले होते. त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कार्यक्रम होता. मात्र कात्रजच्या नवीन बोगद्याच्या जवळून जात असताना त्यांना वर धुराचे लोट दिसले. त्यानंतर त्यांनी गाडी थांबवून पाहिले असता आग भडकलेली दिसली. त्याच बरोरबर त्यांनी तात्काळ आगीच्या ठिकाणी धाव घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यास सुरुवात केली. त्यांनी एका झाडाची फांदी तोडून आगीवर आपटण्यास सुरुवात केली. तर त्यांच्या सहकाऱ्यांनी आगीवर माती टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला.

आग विझवत असतानाच जोराचा वारा सुटल्याने आग आणखीनच पसरत होती. त्यामुळे एककीडे आग विझवित असताना दुसरीकडे आग भडकत चालल्याने शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. मात्र, तरीही शिंदे यांनी हार मानली नाही. त्यांनी आग विझविण्याचं काम सुरूच ठेवलं अन् अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली. त्यानंतर आगीवर माती टाकून आग पूर्णपणे विझल्याची खात्री झाल्यावरच ते तिथून निघाले.

कुणी तरी सिगारेट अथवा पेटवलेली विडी टाकल्याने ही आग लागली असावी. आम्ही योगायोगाने या परिसरातून जात होतो. त्यामुळे आग दिसली आणि आग विझवण्यात यश आलं. वाऱ्यामुळे आग विझविण्यात अडचण येत होती. मात्र, आम्ही प्रयत्न सोडला नाही. वेळीच आग विझवली गेली नसती तर वरती टेकडीपर्यंत ही आग गेली असती आणि डोंगरच पेटला असता, अशी भीती सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच होळीच्या दिवशी झाडं न जाळण्याचं आवाहनही केलं. होळीच्या दिवशी झाडं तोडल्याने केवळ झाडांचंच नुकसान होत नाही तर त्या झाडावर आणि त्याच्याभोवती असलेल्या सरडे, पाली, किडे, मुंग्या आणि पाखरांचंही नुकसान होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here