हायलाइट्स:

  • रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
  • करोना संक्रमणकाळात रेल्वेकडून करण्यात आलेली भाडेवाढ रद्द होणार
  • रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय

नवी दिल्ली : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा करत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. करोना संक्रमणकाळात रेल्वेकडून करण्यात आलेली भाडेवाढ रद्द केली जाणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा प्रवास स्वस्त होणार आहे. त्याचसोबत रेल्वेंना देण्यात आलेला विशेष टॅगही लवकरच हटवण्यात येणार आहे.

ओडिशाच्या झारसुगुडामध्ये रेल्वे मंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय. करोना संक्रमणाचा प्रभाव कमी झाल्यानंतर रेल्वेही पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी म्हटलंय. त्यामुळे येणाऱ्या दोन-अडीच महिन्यांत करोना काळात देण्यात आलेला रेल्वेचा विशेष टॅगही हटवण्यात येईला, असंही त्यांनी म्हटलं.

india china border : ‘१९६२ सारखी युद्धस्थिती होऊ देणार नाही’, चीनचा उल्लेख करत सुप्रीम कोर्टात बोलले केंद्र सरकार
epfo alerts account holder : EPFO च्या खातेदारांनो सावधान… अन्यथा PF Account होईल रिकामे!

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना वेगवेगळ्या पद्धतीनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय. वरिष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष श्रेणीच्या प्रवाशांना अगोदरप्रमाणेच तिकीटदरात सूटही मिळणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर वैष्णव यांनी ही माहिती दिली.

दक्षिण पूर्व रेल्वे आणि पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय समिक्षा बैठकीनंतर रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक सूचना समोर आल्या.

राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी विविध विकासकार्यांशी संबंधित चर्चा करण्यात आली.

‘राम’ नावाचं राजकारण : ‘राम हे राजा दशरथाचे पुत्र नव्हे…’ भाजप सहकारी निषाद यांचा दावाchanni sidhu : सिद्धूंपुढे झुकले पंजाबचे मुख्यमंत्री! अखेर देओल यांचा राजीनामा स्वीकारला

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here