हायलाइट्स:
- अहमदाबादमधील दुहेरी हत्याकांडाची उकल
- दोन मजुरांनी पैशांसाठी केली वृद्ध दाम्पत्याची हत्या
- पोलिसांनी अटक केलेल्या दोघांनी गुन्ह्याची दिली कबुली
- हत्या केल्यानंतर घरात सापडले फक्त ५०० रुपये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील घाटलोदिया परिसरात एका रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये दयानंद शानबाग (वय ९०) आणि विजयलक्ष्मी (८०) हे दोघे मृतावस्थेत आढळले होते. पोलिसांनी सांगितले की, त्या दोघांचीही हत्या झाली होती. आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून त्याच परिसरात एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. या दोघांनी पैशांसाठी वृद्धांची हत्या केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींना पैशांची गरज होती. त्यांना आपल्या कुटुंबीयांना पैसे पाठवायचे होते. आरोपींनी कट रचून एका इमारतीला लक्ष्य करण्याचे ठरवले. या इमारतीच्या १२ फ्लॅटमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी माणसं राहत होती. इमान ठरल्यानुसार इमारतीच्या खाली थांबला. तर मुकुट इमारतीत गेला आणि तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शानबाग यांच्या घरात घुसला. वृद्ध दाम्पत्याने त्याला विरोध केला. त्याने चाकूने दोघांचीही हत्या केली. मुकुट याच्या हाती काहीच लागले नाही. कपाट आणि किचनमध्ये काहीच सापडले नाही. आरोपीला या वृद्धाच्या घरात फक्त पाचशे रुपये सापडले. ते घेऊन तो पसार झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times