मारुती धुळा वाघमोडे आणि आबा मारुती वाघमोडे या दोघांनी अण्णा धुळा वाघमोडे वय ७५ यांचा खून केला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून म्हसवड पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णा वाघमोडे हे झोपले असताना या ठिकाणी जाऊन मारुती वाघमोडे व मुलगा आबा वाघमोडे यांनी आण्णा वाघमोडे यांना झोपेतून उठवून शेतातून पाणी नेऊ दे असे विचारले असता अण्णां वाघमोडे यांनी त्याला नकार दिला.
याच रागातून दोघांनी संगनमताने कुर्हाडीने वार करून खून त्यांचा केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी संशयित मारुती वाघमोडे आणि आबा वाघमोडे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times