यंदा चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पीक चांगले आहे व हे पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. शेतकर्यांनी तूर पिकापसून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मागील पंधरवडयातील असणारे पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील मारुका अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा वातावरणामुळे तूर पिकाला मारुका अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे.
किडीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात २० ते २५ ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास गरजेनुसार खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकची फवारणी करावी.
१. नोव्हुलुरॉन 5.25 इंडोक्साकार्ब 4.50 sc 16 मि.ली
२. थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू.पी २० ग्रॅम किंवा
३. फ्लूबेंडामाइड २० डब्ल्यूजी ६ ग्रॅम किंवा
वरीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसर-या फवारणीच्या वेळेस किटकनाशकाची मात्र तिप्पट करावी. गरज भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसर-या फवारणीच्या वेळेस किटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये. सादर किटकनाशकांच्या शिफारशी या तदर्थ स्वरुपाच्या असून शेतकरी बंधूंना तात्काळ नियंत्रणाच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या असे आव्हान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times